अहमदाबाद कसोटी अनिर्णितेच्या दिशेने जात होती पण राहुल द्रविडचा श्वास थांबला होता. राहुल द्रविड अस्वस्थ झाला त्याला धक्का बसला होता. त्याचे तापमान जास्त होत होते आणि याचा खुलासा खुद्द टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाने केला आहे. अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर राहुल द्रविडने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “सामन्यादरम्यान त्याचे लक्ष न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर होते. न्यूझीलंडने हा सामना दोन गडी राखून जिंकला. शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडने विजय मिळवला आणि या सामन्याने सर्वांचे श्वास रोखून धरले.”
राहुल द्रविडही ड्रेसिंग रुममध्ये हाच सामना पाहत होता आणि याला कारण होते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीट. खरे तर टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंड आणि श्रीलंकेत फक्त ड्रॉची गरज होती, पण यजमान किवी संघाने विजयाच्या दिशेने पावले टाकली. क्षणभर असे वाटले की हा सामनाही श्रीलंकेला जिंकता येईल आणि त्यामुळेच राहुल द्रविड अहमदाबादच्या ड्रेसिंग रूममध्ये अस्वस्थ होत होता.
न्यूझीलंडने द्रविडला दिले टेन्शन!
अहमदाबाद कसोटीनंतर राहुल द्रविड म्हणाला, “ब्रेक दरम्यान आम्ही न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहत होतो. जेव्हा न्यूझीलंड विजयाच्या दिशेने जात होता आणि त्याच्या २-३ विकेट्स पडल्या तेव्हा आम्ही म्हणत होतो की ते विजयासाठी का जात आहेत. हे न्यूझीलंड काय करत आहे? त्यावेळी आम्ही घाबरलो होतो. तू एवढे मोठे फटके का मारत आहेस केन असं मी ड्रेसिंग रुममध्ये ओरडत होतो. पण त्याचा इरादा मात्र वेगळाच होता आणि ड्रॉ ऐवजी त्याने थेट श्रीलंकेला पराभूत करत आम्हाला wtc मध्ये पोहचवले.” जतीन सप्रू, संजय मांजरेकर आणि संजय बांगर यांच्याशी संवाद साधताना त्याने हा किस्सा सांगितला.
केन विलियम्सन याच्या ताबडतोड खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकन संघाला पराभूत केले. पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी श्रीलंका संघ अपात्र ठरला. न्यूझीलंडने मिळवलेला हा विजय मुळीच सोपा नव्हता, पण विलियन्सनने अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करून विजय मिळवलाच. शेवटच्या चेंडूवर विलियन्सन धावबाद होता होता राहिला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
श्रीलंकन संघाने न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले असते आणि भारताला अहमदाबाद कसोटीत विजय मिळला नसता, तर श्रीलंका देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकत होता. पण पराभवानंतर श्रीलंकेचे अंतिम सामन्याचे स्वप्न देखील अपूर्ण राहिले. ७ जून रोजी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात wtcचा अंतिम सामना खेळला जाईल.