भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत तीन वर्षांहून अधिक काळानंतर पहिले कसोटी शतक झळकावले. तत्पूर्वी, विराटने बांगलादेशविरुद्ध २२ नोव्हेंबर २०१९ रोजी ईडन गार्डन्सवर शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. कोहलीने २८वे शतक पूर्ण करण्यासाठी २४१ चेंडू खेळले. विराटच्या शतकानंतर, अनुष्का शर्माने त्याचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की विराट कोहली आजारी असूनही शतक झळकावण्यात यशस्वी झाला. त्यामुळे विराट कोहलीचे हे शतक त्याच्यासाठी तसेच चाहत्यांसाठीही अविस्मरणीय ठरले आहे.

चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीनेही अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पण चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने प्रकृती अस्वास्थ्य असतानाही शतक झळकावले आणि भारताला मजबूत स्थितीत आणले की नाही याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कारण अक्षर पटेलने विराट कोहली आजारी असल्याची माहिती फेटाळून लावली आहे. अक्षर पटेल सामन्यानंतर कोहलीच्या आजाराविषयी म्हणाला, “माहित नाही. तो ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावत होता, त्यावरून तो आजारी आहे असे वाटत नव्हते. कोहली मला नेहमीच प्रेरणा देतो.”

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही वाचा: WTC Final: अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये प्रवेश करेल का? जाणून घ्या

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आठ शतके झळकावली आहेत, त्यापैकी कांगारूंच्या भूमीवर त्याने सहा शतके झळकावली आहेत. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७५वे शतक असले तरी. चहापानानंतरही विराट खेळपट्टीवर तंबू ठोकून उभा होता, त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. चौथ्या दिवसाच्या खेळात अक्षर पटेल याचे भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. विराट कोहलीसह त्याने सहाव्या गड्यासाठी तब्बल १६२ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान त्याने मालिकेतील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. तो ७९ धावा करून बाद झाला.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: आजारपणात खेळत होता विराट कोहली…, पत्नी अनुष्काने इन्स्टा स्टोरी पोस्ट करत केला सलाम

विराट कोहलीच्या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आणि ९१ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता तीन धावा केल्या. पाहुण्या संघाने मॅथ्यू कुहनेमनला (नाबाद ००) ट्रॅविस हेडसह (नाबाद ३) डावाची सलामी दिली. मात्र, पाचव्या षटकात रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर यष्टिरक्षक श्रीकर भरतला झेलबाद करण्यात कुहनेमन नशीबवान ठरला, कारण त्याचा झेल त्याने सोडला. पहिल्या डावात ४८० धावा करणारा ऑस्ट्रेलिया अजूनही भारताच्या ८८ धावांनी मागे आहे.

Story img Loader