IND vs NZ Sanjay Manjrekar’s tweet on Virat Kohli shot against Mitchell Santner : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला, ते विसरणे खुद्द विराट कोहलीसाठी खूप कठीण जाईल. विराट कोहली ज्या चेंडूंवर चौकार मारण्यात माहीर आहे, त्यावर त्याने मिचेल सँटनरला त्याची विकेट भेट दिली. विराटची ही विकेट भारतीय डावाला टर्निंग पॉइंट देणारी ठरली. कारण यानंतर एकामागून एक विकेट पडत राहिल्या आणि संपूर्ण संघ १५६ धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर संजय मांजरेकरांनी विराटच्या या शॉटवर प्रतिक्रिया दिली, ज्यावरून चाहते प्रचंड संतापले आहेत.

बंगळुरू कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघावर खूप दडपण होते. यानंतर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रँक टर्नर खेळपट्टी तयार करण्यात आली. विशेष म्हणजे न्यूझीलंडसाठी रचण्यात आलेल्या सापळ्यात टीम इंडियाच अडकल्याचे दिसत आहे. विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि विराटच्या चाहत्यांमध्ये जुंपली आहे.

विराट कोहलीबद्दल संजय मांजरेकरांची पोस्ट –

मिचेल सँटनरच्या चेंडूवर विराट बाद झाल्यावर मांजरेकरांनी एक्वर पोस्ट करताना लिहिले, ‘ओ डियर! आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट शॉट खेळून त्याने विकेट गमावल्याचे खुद्द विराटलाही कळेल. त्याच्यासाठी वाईट वाटले… कारण तो नेहमीप्रमाणेच खंबीर आणि प्रामाणिक हेतूने आला होता.’ याच डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित खातेही न उघडता बाद झाला, तर विराट एक धाव काढून बाद झाला.

हेही वाचा – Washington Sundar : वॉशिग्टनची ‘अति’सुंदर गोलंदाजी, सलग दुसऱ्या डावात रचिन रवींद्रचा उडवला त्रिफळा, पाहा VIDEO

विराट कोहलीच्या चाहत्यांनी मांजरेकरांवर संताप व्यक्त केला आणि म्हणाले की, कृपया रोहित शर्माबद्दलही बोला, आम्ही नेहमी विराट कोहलीबद्दल बोलतो, हा त्याच्या करिअरमधील सर्वात वाईट शॉट नाही, कधी कधी असे घडते. रोहितच्या एका चाहत्याने लिहिले की रोहित केवळ चार सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे, तर विराट संपूर्ण २०२४ मध्ये अपयशी ठरला आहे.

विराट कोहलीच्या चाहत्याने मांजरेकरांवर संताप व्यक्त केला आणि म्हणाले की, कृपया रोहित शर्माबद्दलही बोला, आपण नेहमी विराट कोहलीबद्दल बोलता, हा त्याच्या करिअरमधील सर्वात वाईट शॉट नाही, कधी कधी असे घडते.

हेही वाचा – ‘विराट कोहलीने आता लंडनमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलंय…’, फ्लॉप शोमुळे चाहते संतापले, मीम्स व्हायरल

यानंतर रोहितच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘रोहित केवळ चार सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे, तर विराट संपूर्ण २०२४ मध्ये अपयशी ठरला आहे.’