India vs Afghanistan 2nd T20 Match, Akshar Patel: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे अफगाणिस्तान संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. अक्षरने चार षटकांत १७ धावा देत दोन गडी बाद केले. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. अक्षरने शेवटच्या टी-२० मध्ये चार षटकात केवळ २३ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याच्या टी-२० मध्ये २०० विकेट्सही पूर्ण झाल्या आहेत. अक्षरने या फॉरमॅटमधील आपल्या यशाचे रहस्य सांगितले आहे.

अक्षर पटेलने केला हापराक्रम

टी-२० मध्ये (आंतरराष्ट्रीय आणि लीगसह) २०० विकेट्स पूर्ण करणारा अक्षर हा ११वा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या वर हर्षल पटेल (२०९ विकेट्स), रवींद्र जडेजा (२१६ विकेट्स), जयदेव उनाडकट (२१८ विकेट्स), हरभजन सिंग (२३५ विकेट्स), जसप्रीत बुमराह (२६० विकेट्स), अमित मिश्रा (२८४ विकेट्स), भुवनेश्वर कुमार (२८८ विकेट्स) आहेत. , रविचंद्रन अश्विन (३०१ विकेट्स), पीयूष चावला (३०२ विकेट्स) आणि युजवेंद्र चहल (३३६ विकेट्स). अक्षरने २३४व्या सामन्यात २०० टी-२० विकेट्स पूर्ण केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ६.९७ आहे. त्याचवेळी, अक्षरने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत ४९ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये तो नवव्या क्रमांकावर आहे.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

हेही वाचा: IND vs AFG: भारताच्या विक्रमी विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूश; म्हणाला, “१५० टी-२० सामने होणे हा प्रवास…”

अक्षर पटेल ठरला सामनावीर

अक्षरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, “छान वाटतंय. मला आत्ताच कळले की मी टी-२०मध्ये २०० विकेट्स मिळवल्या आहेत. भारतासाठी चांगली कामगिरी करत राहणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. खरे सांगायचे झाले तर, मी हा विक्रम काही वर्षांनी विसरून जाईल. काही वर्षानी किती विकेट्स घेतल्या हे मला आठवणार देखील नाही.” त्याच्या यशाचे रहस्य सांगताना अक्षर पटेल म्हणाला, “मी थोडी हळू गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या गोलंदाजीत बदल करत आहे. आता मी या गोष्टी चांगल्या प्रकारे कसे होतील, यावर प्रयत्न करत आहे. मला पॉवर प्लेमध्येही गोलंदाजी करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.”

अक्षरने सांगितले यशाचे रहस्य

अक्षर पटेल म्हणाला, “टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. मी षटकार खायला तयार आहे कारण, त्याच चेंडूवर तुम्हाला दुसऱ्यावेळी विकेट मिळू शकते. याआधी, जर एखादा फलंदाज मला मारत असेल तर मी माझे प्लॅन बदलायचो, पण आता मी माझ्या योजनांवर ठाम राहिलो आणि माझ्याविरुद्ध फलंदाजांना संधी देतो. त्यामुळे मला विकेट्स मिळत आहेत.” अक्षरने आयपीएलमध्ये १३६ सामन्यात ११२ विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याची निवड होऊ शकते, असे मानले जात आहे.

हेही वाचा: जेतेपदाची हुलकावणी; मलेशिया बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिराग पराभूत

काय घडलं सामन्यामध्ये?

सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत सर्व गडी गमावून १७२ धावा केल्या. गुलबदिन नायबने सर्वाधिक ५७ धावा केल्या. ३५ चेंडूंच्या खेळीत त्याने पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी नजीबुल्ला झादरान २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. करीम जनातने १० चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्याचवेळी मुजीब-उर-रहमानने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१ धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शिवम दुबेला एक विकेट मिळाली.