IND vs AFG Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज (८ सप्टेंबर) भारत-अफगाणिस्तान यांच्यात लढत झाली. या दोन्ही संघांचे आव्हा अगोदरच संपुष्टात आलेल्यामुळे आजचा सामना औपचारिक होता. एकीकडे विराट कोहलीने शतकी खेळी करत हा सामना संस्मरणीय ठरवला. तर दुसरीकडे ज्या अफगाणिस्तानने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवलं त्या अफगाणिस्तानवर भारताने आरामात विजय मिळवला. मात्र पाकिस्तानविरोधातील सामन्यात पराभव आणि अंतिम सामन्यात पोहचण्यात आलेले अपयश यामुळे क्रीडा रसिकांमध्ये अनुत्साह दिसला. भारताने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तान संघाला मात्र फक्त १११ धावा करता आल्या. आजच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Virat Kohli Century : विराटची अफाट कामगिरी! अफगाणिस्तानविरोधात झळकावलं ७१वं शतक

हेही वाचा >> पाकिस्तानच्या क्रिकेटरला भारताच्या ‘डिंपल गर्ल’ची भुरळ, खास फोटो शेअर करत म्हणाला; “माझी सर्वांत…”

भारताने विजयासाठी दिलेल्या १२३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानच्या संघाची त्रेधातिरपिट उडाली. अफगाणिस्तानचे सलामीचे दोन्ही फलंदाज हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या इब्राहिन झरदानने चांगला खेळ केला. त्याने ५९ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. झरदान वगळता अफगाणिस्तानचा कोणताही खेळाडू २० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही.

हेही वाचा >>T20 World Cup : टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्याचं वेळापत्रक जाहीर; भारत ‘या’ दोन संघांशी भिडणार

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजच्या सामन्यात रोहित शर्मा नसल्यामुळे केएल राहुल आणि विराट कोहली सलामीला आले. विराट कोहली संपूर्ण २० षटके होईपर्यंत मैदानावर टिकून होता. त्याने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत १२२ धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुलनेही ४१ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावत ६२ धावा केल्या. पुढे सूर्यकुमार यादव सहा धावा करून स्वस्तात बाद झाला. तर ऋषभ पंत २० धावांवर नाबाद राहिला.

‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी

गोलंदाजी विभागात आज भारतीय संघानेही दिमाखदार कामगिरी किली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार षटकांत अवघ्याच चार धावा देत तब्बल ५ बळी घेतले. तर अर्शदीप सिंग, रवीचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांनी प्रत्येक एक बळी घेत अफगाणिस्तान संघाची फलंदाजी खिळखिळी केली. फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार या दोघांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने विजय साकार केला. मात्र या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याआधी भारताने असा खेळ दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.