यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात विराट कोहलीने विराट कामगिरी करून दाखवली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने दमदार शतक झळकावले आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून क्रिकेटप्रेमींचे विराट शतकी खेळी कधी खेळणार याकडे लक्ष लागले होते. मात्र आज त्याने अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात लाखो क्रिकेटप्रेमींची ही इच्छा पूर्ण केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले ७१ वे शतक झळकावले आहे.

हेही वाचा >>> पाकिस्तानच्या क्रिकेटरला भारताच्या ‘डिंपल गर्ल’ची भुरळ, खास फोटो शेअर करत म्हणाला; “माझी सर्वांत…”

आज अफगाणिस्तान विरोधातील सामन्यात भारताचा स्टार फलंदाज चांगलाच तळपला. त्याने साधारण दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली आहे. भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलेले आहे. असे असले तरी आजच्या औपचारिक सामन्यात मात्र विराटने धडाकेबाज फलंदाजी करत भारतीयांचे मन जिंकले. त्याने आपले ७१ वे शतक झळकावले आहे. ही कामगिरी त्याने ५३ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ४ षटकार यांच्या जोरावर केली आहे.

हेही वाचा >>>T20 World Cup : टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्याचं वेळापत्रक जाहीर; भारत ‘या’ दोन संघांशी भिडणार

विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून धावांसाठी झगडताना दिसत होता. अनेकवेळा शून्यावर बाद होण्याची त्याच्यावर वेळ आली होती. मात्र महिन्याभराचा ब्रेक घेतल्यानंतर विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. त्याने अफगाणिस्तानविरोधातील आजच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. त्याने शतकी खेळी करून ६१ चेंडूंमध्ये १२२ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Story img Loader