IND vs AFG, World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारताला आता ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. डेंग्यूमधून बरा झालेला शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

बीसीसीआयने वैद्यकीय अपडेट जारी केले

बीसीसीआयने शुबमनबाबत वैद्यकीय अपडेट दिले आहे. बोर्डाने ट्वीट करून लिहिले की, “टीम इंडियाचा फलंदाज शुबमन गिल ९ ऑक्टोबरला टीमसोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत खेळला जात असताना हा सलामीचा फलंदाज खेळू शकला नाही. ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टीम इंडियाच्या पुढील सामन्यातही तो खेळू शकणार नाही. शुबमन चेन्नईत राहणार असून तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल.”

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

शुबमनची तब्येत बिघडली आहे, तो आजारातून अजूनही सावरत आहे

अलीकडच्या काळात, भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधला स्टार फलंदाज शुबमन हा तापाने त्रस्त आहे. डेंग्यूसाठी चाचणी केली जाणार होती, परंतु बीसीसीआयकडून यासंदर्भात आलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने म्हटले आहे की, “शुबमनला खूप ताप आहे.” त्याचवेळी बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले होते की, “शुबमन डेंग्यू या आजाराने ग्रस्त आहे. डेंग्यूमधून बरे होण्यासाठी आणि पुन्हा मॅच-फिट होण्यासाठी खेळाडूला साधारणत: ७-१० दिवस लागतात. मात्र, प्लेटलेटच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यास, रुग्णाला बरे होण्यास जास्त वेळ लागू शकतो.”

अफगाणिस्ताननंतर भारताला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याव्यतिरिक्त, शुबमन १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर राहू शकतो. शुबमनने यावर्षी १२०० धावा केल्या आहेत आणि अलीकडेच कर्णधार रोहित शर्मासह एक यशस्वी सलामीची जोडी तयार केली आहे. तो दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्यास भारतीय संघासाठी मोठा धक्का बसू शकतो.

हेही वाचा: IND vs AUS: विराट कोहलीच्या झेल सोडल्यावर अश्विनने केला खुलासा; म्हणाला, “मी एकाच जागेवर बसून…”

इशान किशन पुन्हा ओपन करू शकतो

टीम मॅनेजमेंटला शुबमन गिलबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन त्याच्या जागी रोहित शर्मासोबत पुन्हा एकदा सलामी करताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इशान किशननेही सलामी दिली होती, मात्र त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने आतापर्यंत २६ सामने खेळले आहेत. या काळात त्याची सरासरी ४४च्या आसपास आहे. इशानच्या नावावर ८८६ धावा आहेत. त्याने एक शतक आणि सात अर्धशतके केली आहेत. किशनने यावर्षी तीन अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा: IND vs AUS: माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने के.एल. राहुलबाबत केले सूचक विधान; म्हणाला, “आता तू खऱ्या…”

अफगाणिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-११

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Story img Loader