Rohit Sharma and Virat Kohli: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला ११ जानेवारीपासून मोहालीत सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित कर्णधार म्हणून संघात परतला आहे. पुनरागमन करणाऱ्या या दोन्ही दिग्गजांना मालिकेत अनेक विक्रम करण्याची संधी आहे. कोहली टी-२०मध्ये १२ हजार धावा पूर्ण करू शकतो. त्याचवेळी रोहित आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये चार हजार धावांचा आकडा गाठू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कोहलीने ३५ धावा केल्या तर तो टी-२० सामन्यात १२ हजार धावा पूर्ण करू शकतो. विराटने आतापर्यंत टी-२० फॉरमॅटमध्ये चार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त, तो दिल्ली, मुंबई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. कोहलीने २००७ पासून या फॉरमॅटमध्ये ३७४ सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ४१.४०च्या सरासरीने ११,९६५ धावा आहेत. विराटने ८ शतके आणि ९१ अर्धशतके केली आहेत.

टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कोहलीने ३५ धावा केल्या तर तो वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि किरॉन पोलार्ड आणि पाकिस्तानचा शोएब मलिक यांच्या क्लबमध्ये सामील होईल. गेलने ४६३ सामन्यांमध्ये सर्वाधिक १४,५६२ धावा केल्या आहेत. मलिकने ५२५ सामन्यात १२,९९३ धावा केल्या आहेत. तर पोलार्डने ६३७ सामन्यात १२,३९० धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Team India: BCCIला मिळाले नवीन प्रायोजक, होम सीझनसाठी केला मोठा करार; कोण आहेत ते? जाणून घ्या

कोहली आणखी एक कामगिरी करू शकतो

विराटने टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ९९ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक ५०+ धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ११० वेळा ५०+ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नरने १०७ वेळा अशी कामगिरी केली आहे. कोहलीने पुन्हा एकदा ५० धावांचा टप्पा ओलांडला तर तो टी-२०मध्ये ५०+ १०० वेळा धावा करणारा तिसरा खेळाडू होईल.

रोहित शर्मा चार हजार धावा पूर्ण करू शकतो

या मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये चार हजार धावा पूर्ण करण्याची संधी असेल. त्याने १४८ सामन्यात १३९.२४च्या स्ट्राईक रेटने ३८५३ धावा केल्या आहेत. या काळात हिटमॅनची सरासरी ३१.३२ होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने १४७ धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये चार हजार धावा पूर्ण करेल. त्याच्या आधी दोन खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. सुझी बेट्सच्या नावावर १५२ सामन्यांमध्ये ४११८ धावा आहेत. तर विराटने ११५ टी-२० सामन्यांमध्ये ४००८ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: IND vs SA: न्यूलँड्सच्या खेळपट्टीबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड चिंतेत

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs afg multiple records to be won against afghanistan last chance for kohli rohit sharma find out avw
Show comments