ICC Cricket World Cup, India vs Afghanistan: विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दिल्लीत तुफानी फलंदाजी केली. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने स्फोटक शतक झळकावले. सलामीवीर म्हणून त्याने वनडेतील २९ वे शतक झळकावले आणि सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं झळकावण्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या डावात त्याने एकाही गोलंदाजाला सोडले नाही आणि ६३ चेंडूत शतक झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून ४५ शतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनची ४९ शतके आहेत. यापैकी त्याने सलामीवीर म्हणून ४५ शतकं ठोकली आहेत. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३१ शतके झळकावली आहेत. श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्याने २८ शतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सलामीवीर म्हणून सर्व शतके झळकावली आहेत.

हाशिम आमलाने २७ आणि ख्रिस गेलने २५ शतकं –

सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि सनथ जयसूर्या यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिम आमला सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने २७ शतके झळकावली आहेत. आमलाने सलामीवीर म्हणून सर्व शतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने २५ शतके झळकावली आहेत. गेलने सलामीवीर म्हणूनही शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – World Cup 2023, IND vs AFG: विराटच्या बालेकिल्ल्यात रोहितचा धमका, ‘हिटमॅन’च्या झंझावाताने अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा, भारताचा सलग दुसरा विजय

रोहित शर्माने ८४ चेंडूत कुठल्या १३१ धावा –

अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्माने ८४ चेंडूत ५ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने १३१ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १५५.९५95 होता. राशिद खानने रोहित शर्माची विकेट घेतली. गुगली बॉल स्वीप करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा बोल्ड झाला. रोहित २६व्या षटकात बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.