IND vs AFG, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. टीम इंडियाला विजयाची मालिका कायम राखून हा सामना जिंकायचा आहे आणि गुणतालिकेत आपले स्थान आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, त्याचवेळी अफगाणिस्तान अपसेट करून विजय संपादन करण्याचा प्रयत्न करेल. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान बर्थ डे बॉय हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला त्याच्या वाढदिवशी विकेट घेऊन गिफ्ट दिले. त्याच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरने अप्रतिम झेल घेतला, त्याचा झेलची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरु आहे.

कसा घेतला शार्दुल ठाकूरने झेल?

अफगाणिस्तानला ६३ धावांवर दुसरा धक्का बसला. १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने रहमानउल्ला गुरबाजला शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केले. शार्दुलने कौशल्य दाखवत सीमारेषेवर उत्कृष्ट झेल घेतला. झेल घेतला त्याचा तोल बिघडल्याने शार्दुलने हवेत चेंडू फेकला आणि तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. मग परत येऊन तो झेल घेतला. गुरबाजने २८ चेंडूत २१ धावांची खेळी खेळली. हार्दिक पांड्याचा आज वाढदिवस असल्याने त्याने ही भारतीय संघाला विकेट गिफ्ट म्हणून दिली आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

अफगाणिस्तानला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. ६३ दोन विकेट्स पडल्या. रहमानउल्ला गुरबाजचा उत्कृष्ट झेल घेतला आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरने रहमत शाहला त्याच्याच गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत बाद केले. रहमतने २२ चेंडूत १६ धावांची खेळी खेळली. सध्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई क्रीजवर आहेत. १४ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ६६ धावा आहे.

शार्दुलचे पुनरागमन

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये फिरकी गोलंदाजांना सहसा खूप मदत मिळते, पण दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात फलंदाजांनी भरघोस धावा केल्या. येथील नवीन खेळपट्टी फलंदाजांना पसंत पडत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने एक स्पिनर कमी केला आहे आणि एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन आला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रविचंद्रन अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरचा प्लेइंग-११ मध्ये समावेश केला आहे.

दोन्ही संघातील ११ खेळत आहे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.