IND vs AFG, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने आले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर आजच्या सामन्यात भारताने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला. कर्णधार रोहित शर्माने अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वगळले. त्यांच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली. अश्विनला वगळण्यात आल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर भडकले आणि त्यांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले.

स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टरशी बोलताना गावसकर यांनी रोहित शर्माच्या संघ निवडीवर संताप व्यक्त केला. म्हणाले की, “अशा परिस्थितीत अश्विनने काय चूक केली आहे याची मला माहिती नाही.” तसेच, त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीबद्दलही खेद व्यक्त केला. शमीने २०१९ विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याला प्लेइंग-११मध्ये स्थान मिळाले नव्हते.

Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

हेही वाचा: IND vs AFG: ‘हार्दिक’ शुभेच्छा! ‘बर्थ डे’ बॉय पांड्याच्या गोलंदाजीवर अष्टपैलू शार्दुल ठाकूरचा अफलातून झेल, पाहा Video

अश्विनला संघाबाहेर ठेवण्याची सवय : गावसकर

गावसकर म्हणाले, “पुन्हा एकदा अश्विनला सामन्यातून बाहेर ठेवले आहे. अश्विनने काय चूक केली हे मला माहीत नाही. त्याला संघाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मला वाटले होते की शमीने २०१९ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती, त्यामुळे त्याला संधी मिळेल. रोहित शर्मा काय विचार करतो हे मला आताच सांगता येणार नाही.” अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली. अफगाणचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टॉसच्या वेळी रोहित शर्मा काय म्हणाला?

नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. आम्ही काल संध्याकाळी दवाचे प्रमाण पाहिले. मला वाटत नाही की विकेट फार बदलेल. चांगली गोलंदाजी करणे आणि परत येऊन चांगली फलंदाजी करणे आवश्यक आहे. अश्विन या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर आला आहे.” एक बदल वगळता भारताने प्लेईंग-११ मध्ये कोणताही बदल केला नाही.

हेही वाचा: IND vs AFG: विराट-नवीन वादावर अफगाणिस्तान कर्णधाराचे सूचक विधान; म्हणाला, “१४० कोटी भारतीयांचे मन…”

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.