Video of Rohit and Virat making fun of Shivam Dube went viral : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर मालिकेत २-० ने अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकं झळकावत विजयात मोलाचे योगदान दिले. सामन्यानंतर शिवम दुबे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विराट-रोहित शिवमची मजा घेताना दिसत आहेत.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत १७३ धावांवर गारद झाला. भारताने १५.४ षटकांत चार विकेट गमावत १७३ धावा करून सामना जिंकला. या विजयात यशस्वी जैस्वालने ६८ धावांचे योगदान दिली. त्याचबरोबर शिवम दुबेनेही नाबाद ६३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने ३२ चेंडूचा सामना करताना ५ चौकार आणि ६ षटकांच्या मदतीने वादळी खेळी साकारली.
भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिल्यानंतर शिवम दुबेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सामना संपल्यानंतर शिवम दुबे आपल्या संघालाबरोबर शांत उभा राहिलेला दिसत आहे. त्याचवेळी विराच कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा शिवमची मस्करी करताना दिसत आहे. त्यानंतर विराट आणि रोहित मोठ्या हसताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ आात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – VIDEO : विराटचे जोकोविचशी पहिल्यांदा कसे झाले होते संभाषण? स्वत: किंग कोहलीने सांगितला किस्सा
विराट कोहलीने १४ महिन्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये केले पुनरागमन –
विराट कोहली १४ महिन्यांनंतर परतला आहे. त्याने १६ चेंडूचा सामना करताना २९ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १८१.२५ होता. रोहित शर्मा आणि जितेश शर्मा यांना खातेही उघडता आले नाही. रिंकू सिंगने नाबाद नऊ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून करीम जनातने दोन गडी बाद केले. फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – IND vs AFG 2nd T20 : टीम इंडिया मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’! शिवम-जैस्वालने झळकावली वादळी अर्धशतकं
रोहित शर्माने रचला इतिहास –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात १५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला हे स्थान मिळवता आले नाही. अशा परिस्थितीत रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. रोहितच्या कारकिर्दीतील नवीन कामगिरी पाहून त्याचे चाहते आनंदी झाले. या विक्रमासाठी कर्णधारावर अभिनंदनाचा वर्षाव केला.