Holkar Stadium Indore Ticket Price : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडियाला २०२४ मधील पहिली मालिका घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-२० मालिका असेल. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत, दुसरा इंदूरमध्ये आणि तिसरा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. इंदूरमध्ये होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

इंदूरमधील सामन्याचे तिकीट दर –

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात इंदूरमध्ये १४ जानेवारीला होणाऱ्या टी-२० सामन्याच्या लोअर ईस्ट स्टँडच्या सर्वात स्वस्त तिकिटासाठी चाहत्यांना ७४३ रुपये मोजावे लागतील, तर पहिल्या मजल्यावर असलेल्या साऊथ पॅव्हेलियनचे सर्वात महागडे तिकीटासाठी ५,९४७ रुपये द्यावे लागतील. मध्य प्रदेश क्रिकेट ऑर्गनायझेशन (एपीसीए) च्या अधिकाऱ्याने तिकीट दर जाहीर केल्यानंतर ही माहिती दिली आहे.

IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?

सुमारे २८,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या स्थानिक होळकर स्टेडियममध्ये अफगाणिस्तान प्रथमच सामना खेळणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, भारत-अफगाणिस्तान टी-२० सामन्याच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री ३० डिसेंबरला सकाळी ६ वाजता सुरू होईल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होईल आणि १७ जानेवारीला संपेल.

हेही वाचा – BBL 2023 : स्पेन्सर जॉन्सनचा वेगवान चेंडू लागल्याने ॲलेक्स हेल्स जमिनीवर कोसळला, पाहा VIDEO

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेचे वेळापत्रक –

पहिला सामना – ११ जानेवारी २०२४, मोहाली
दुसरा सामना – १४ जानेवारी २०२४, इंदूर
तिसरा सामना – १७ जानेवारी २०२४, बंगळुरू

हेही वाचा – Year Ender 2023 : यंदा टीम इंडियात ‘या’ १६ खेळाडूंनी केले पदार्पण, जाणून घ्या कोणकोणत्या खेळाडूंचा आहे समावेश

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हेड टू हेड आकडेवारी –

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवला असून १ सामना अनिर्णित राहिला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने ४ सामने जिंकले असून एक अनिर्णित राहिला. उभय संघांमधील शेवटचा सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. या सामन्यातही टीम इंडियाने बाजी मारली होती. याचाच अर्थ अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला एकदाही हरवलेले नाही.

Story img Loader