India vs Afghanistan T20 Series, Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्मा वर्षभराच्या विश्रांतीनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तो अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत टीम इंडियामध्ये परतणार आहे. जर रोहित शर्मा या मालिकेत पुनरागमन करत असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की बीसीसीआय त्याला टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देत आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे त्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्माच टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो असे त्याने म्हटले आहे. आम्ही रोहित शर्माबरोबर दीर्घकाळ चर्चा केली असून तो टी-२० विश्वचषकात कर्णधारपद स्वीकारण्यास तयार आहे.”

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
IND vs BAN 2nd Test Highlights in marathi
IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर ‘बॅझबॉल’ शैलीत मालिका विजय, ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम
India Squad for Bangladesh T20I Series Announced Pacer Mayank Yadav and Nitish Reddy Maiden Call up IND vs BAN
IND vs BAN: मयांक यादव भारतीय संघात, वरुण चक्रवर्ती-जितेश शर्माचं पुनरागमन; बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर
Try to keep him in his crease says Nathan Lyon on Rishabh Pant
‘…षटकारांची भीती वाटत नाही’, ऋषभ पंतबद्दल बोलताना नॅथन लॉयन काय म्हणाला?
India beat Bangladesh by 280 Runs in 1st Test Ravichandran Ashwin fifer Rishabh Pant Shubman Gill Centuries
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

अफगाणिस्तान मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर लगेचच भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-२० मालिका असणार आहे. अशा स्थितीत, विश्वचषकासाठी टीम कॉम्बिनेशनसह इतर गोष्टी आजमावण्याची भारतासाठी ही कदाचित शेवटची संधी असेल. त्यामुळेच ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: Pakistan Cricket: शाहिद आफ्रिदीने आपल्याच जावयाच्या कर्णधारपदावर उपस्थित केला प्रश्न, म्हणाला, “शाहीन चुकून टी-२०…”

टी२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या पुनरागमनावर शंका का घेतली गेली?

आतापर्यंत असे मानले जात होते की रोहित शर्मा अफगाणिस्तान मालिकेत क्वचितच सहभागी होईल. २०२४च्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही रोहित नसल्याचा दावा केला जात होता. गेल्या टी-२० विश्वचषकापासून रोहित कोणत्याही टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत सहभागी झाला नाही, त्यामुळे अशी अटकळ बांधली जात होती. तसेच, हार्दिक पंड्याचा कर्णधारपदासाठीचा दावा हेही यामागे मोठे कारण होते. सध्या टीम इंडिया एकापेक्षा एक स्टार खेळाडूंनी भरलेली आहे. अशा परिस्थितीत तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना एक किंवा दोन क्रिकेट फॉरमॅटपर्यंत मर्यादित ठेवण्याचा दबाव बीसीसीआयवर आहे.

विश्वचषकाच्या आढावा बैठकीतच झाला निर्णय!

२०२३च्या विश्वचषकानंतर झालेल्या बैठकीत रोहित शर्माने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी टी-२० विश्वचषकाबाबत स्पष्ट चर्चा केली. रोहितने स्पष्टपणे विचारले होते की २०२४च्या टी-२० वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयच्या योजनांमध्ये त्याचा समावेश आहे का? त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीसह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याला सहमती दर्शवली.

हेही वाचा: IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सलग नऊ पराभवाची मालिका हरमनब्रिगेड तोडणार का? जाणून घ्या

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० वेळापत्रक २०२४

११ जानेवारी: पहिला सामना (मोहाली)

१४ जानेवारी: दुसरा सामना (इंदोर)

१७ जानेवारी: पहिला सामना (बंगळुरू)

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० मालिकेसाठी संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).