Virat Kohli IND vs AFG Superman Catch: बंगळुरूच्या मैदानावर अफगाणिस्तानने भारतीय गोलंदाजांसमोर दणदणीत खेळी करत सर्वांनाच थक्क केले होते. गुलबदीन नईब आणि मोहम्मद नबी यांनी फटकेबाजीमुळे आज अनुभवी भारतीय संघ पराभूत होणार असेही काही क्षण वाटत होते. टाय झालेल्या मॅचमध्ये दोन दोन सुपर ओव्हर टाकल्या गेल्या ज्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून रिंकू सिंग, रोहित शर्मा मैदानात फलंदाजीला उतरले होते. चौथ्या चेंडूवर रिंकू बाद होताच संजू सॅमसनला मैदानात आणण्यात आले. रोहित व संजूची धावांची भागीदारी पुढे जाण्याआधीच रोहित शर्मा यष्टीरक्षक गुरबाझच्या अचूक फेकीने धावबाद झाला आणि ११ धावा करून भारताचा डाव संपला. गोलंदाजीमध्ये रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आणि पहिलाच चेंडू हा फलंदाजाने भिरकावताच रिंकने झेलला. तिसऱ्या चेंडूचा एक ब्रेक घेऊन पुन्हा रिंकूनेच चौथा बॉल झेलला. अशाप्रकारे कालचा अटीतटीचा सामना भारताच्या विजयासह संपन्न झाला. यातील अनेक लक्षवेधी क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट कोहली फलंदाजीमध्ये कमाल करू शकला नसला तरी धावांचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला पाच धावा घेण्यापासून रोखताना कोहलीने घेतलेली उडी या सामन्याचा आणखी एक हिट पॉईंट ठरली. अफगाणिस्तानला आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी २१३ धावांची गरज होती आणि इब्राहिम झद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी अर्धशतके झळकावल्यामुळे त्यांना चांगली सुरुवात मिळाली होती. या उत्साहात मोहम्मद नबीने वेग कायम ठेवण्यासाठी न बघता फटकेबाजी सुरु केली होती. यावेळी वॉशिंग्टन सुंदरला नबीच्या रूपात तिसरी विकेट मिळाली, ज्याने करीम जनातला मैदानात आणले.

जनतने षटकार मिळवण्याच्या आशेने ऑफ-स्पिनरला सीमारेषेकडे चेंडू भिरकावला होता. प्रथमदर्शनी हा षटकारच वाटत होता पण तितक्या भारतीय स्टार विराट कोहलीने अक्षरशः एखाद्या सुपरहिरोप्रमाणे हवेत झेप घेतली एका हाताने चेंडू पकडला. मात्र तोल गेल्याने, हा झेल शक्य होईल असे वाटत नव्हते त्यातही कोहलीने हुशारीने चेंडू मैदानात जितका शक्य होईल तितका दूर फेकला ज्यामुळे षटकार तर नाहीच पण हा सीमारेषा ही गाठू शकला नाही.

Video: कोहलीची सुपरमॅन कॅच

हे ही वाचा << विराट अनुष्काचं ठरलं! राम मंदिराच्या उद्घाटनासाठी कोहलीची बीसीसीआयकडे खास विनंती, २१ जानेवारीलाच विरूष्का..

दरम्यान, क्षेत्ररक्षणात कसर भरून काढण्याचा प्रयत्न करूनही कोहलीचं फलनदाजीतील अपयश सुद्धा चर्चेचा मुद्दा ठरला. कोहली गोल्डन डकवरच बाद झाल्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होते. यशस्वी जैस्वाल बाद होण्यापूर्वी भारताने दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर विराट क्रीझवर आला पण मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो झेलबाद झाला. रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्या आक्रमक खेळीपूर्वी भारताची ४ बाद २२ अशी अवस्था झाली होती. रोहितने 5वे T20I शतक झळकावल्यामुळे भारताने २० षटकात २१२ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs afg virat kohli superman catch jaw dropping video catches wicket with one hand kohli falls on ground super over highlights svs
Show comments