IND vs AFG, World Cup 2023: विश्वचषक २०२३चा ९वा सामना आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ आले आहेत. आयपीएल २०२३मध्ये विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील लढतीनंतर हे दोन खेळाडू पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीत विराटसमोर नवीन उल हक

अफगाणिस्तानचे वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक आणि विराट कोहली आयपीएलच्या १६व्या हंगामात प्रसिद्धीच्या झोतात आले. आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडले. त्यानंतर हा लढा अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यात पुन्हा एक या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने मोठ-मोठी विधानं केली आहेत. यात त्याने विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्या वादाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.दा हे दोन खेळाडू आमनेसामने आले आहेत.

Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Omar Abdullah Said?
India Alliance “..तर इंडिया आघाडी बंद करा”; ओमर अब्दुल्लांंचं वक्तव्य, आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत?
Sam Konstas Reveals Chat with Virat Kohli After On Field Collision Between them
Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”
Rashid Khan 11 Wickets career best helps Afghanistan register series win vs Zimbabwe Ramat Shah Century
AFG vs ZIM: रशीद खानची कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी, ११ विकेट्स घेत अफगाणिस्तानला असा मिळवून दिला मालिका विजय
Sunil Gavaskar Big Statement on Team India Test Series Defeat Against Australia Rohit Sharma IND vs AUS bdg 99
IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?
Gautam Gambhir Statement on Rohit sharma Virat Kohli Test Future Said Its up to Them IND vs AUS
IND vs AUS: “रोहित-विराटवर आहे काय निर्णय घ्यायचा पण…”, गौतम गंभीरचं कसोटी भविष्याबाबत मोठं वक्तव्य, मालिकेनंतर काय म्हणाला?
Virat Kohli Angry After Getting Out and Punches Himself in Frustration After Same Dismissal Video
IND vs AUS: विराट कोहलीचा बाद होताच सुटला संयम, झेलबाद झाल्याचे पाहताच स्वत:वरच संतापला अन्… VIDEO व्हायरल

या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने मोठ-मोठी विधानं केली आहेत. यात त्याने विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्या वादाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला की, “आम्ही नेटमध्ये शानदार फिरकीपटूंसोबत खेळतो. राशिद, मोहम्मद नबी, नूर अहमद आणि मुजीबला पाहिलं, तर आम्ही त्यांच्याविरुद्ध दररोज खेळतो. त्यामुळे मला वाटते की, फिरकी गोलंदाजी खेळण्यात आमचा संघ चांगला आहे.”

तो पुढे स्टार स्पोर्ट्सशी बोलताना असेही म्हणाला की, “तुम्हाला माहिती आहे की, त्या सामन्यात आम्ही संघर्ष केला होता. मात्र, एका सामन्याच्या आधारे असे म्हणता येणार नाही की, आमचे फलंदाज फिरकीपटूंचा सामना करू शकत नाहीत. तो सामना भूतकाळाची गोष्ट आहे आणि आम्हाला माहिती आहे की, आम्ही फिरकीपटूंविरुद्ध चांगले खेळू शकतो. आम्ही पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू. आम्ही भारतीय खेळाडू आणि १४० कोटी चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी आलो आहोत.”

रॉबिन उथप्पाचे विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील भांडणावर मोठे विधान

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा म्हणाला, “मुजीब उर रहमान विरुद्ध इशान किशन आणि रोहित शर्मा एक असतील. फजलहक फारुकी भारताच्या टॉप ऑर्डर आणि नवीन-उल-हक विरुद्ध विराट कोहली हा सामना रंजक असेल. त्यांच्याकडे पाहताना आयपीएलमधील घटना आठवते पण, त्यांना पुढे जाताना पाहणे सर्वांसाठी चांगले राहील.”

हेही वाचा: IND vs AFG: ‘हार्दिक’ शुभेच्छा! ‘बर्थ डे’ बॉय पांड्याच्या गोलंदाजीवर अष्टपैलू शार्दुल ठाकूरचा अफलातून झेल, पाहा Video

नवीन-उल-हकची एकदिवसीय कारकीर्द

नवीन-उल-हकने अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत फक्त आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये नवीन उल हकने २५.८०च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. नवीन उल हकने अद्याप भारताविरुद्ध एकही वन डे सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत त्याला या सामन्यात संधी मिळाली तर हा त्याचा भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना असेल.

Story img Loader