India vs Afghanistan 1st T20 Match: टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या अंतिम टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांच्या नजरा कर्णधार रोहित शर्मावर आहेत. गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात रोहितबरोबर विराट कोहलीही परतणार होता, मात्र प्रशिक्षक राहुल द्रविडने सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले की, विराट त्याच्या कौटुंबिक कारणांमुळे या सामन्यात खेळणार नाही. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये कोहली उपलब्ध असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रोहित शर्मा नोव्हेंबर २०२२ नंतर पहिला टी-२० सामना खेळणार आहे. दोन्ही देशांमधील ही पहिली टी-२० मालिका आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तान संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज राशिद खान संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. राशिदवर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.
रोहित यशस्वीबरोबर सलामीला येईल
दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर बुधवारीच भारतीय संघ पी.सी.ए. स्टेडियमवर पोहचला. संध्याकाळपर्यंत असे मानले जात होते की रोहित आणि विराट १४ महिन्यांनंतर टी-२०मध्ये एकत्र पुनरागमन करतील, परंतु द्रविडच्या खुलाशानंतर सर्वांच्या नजरा रोहितकडे लागल्या आहेत. रोहित आणि विराट यांनी अखेरचा टी-२० सामना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित यशस्वी जैस्वालबरोबर सलामीला फलंदाजी करू शकतो. होम ग्राऊंड असलेल्या शुबमन गिल पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. या सामन्यात तिलक वर्माही खेळण्याची शक्यता आहे.
विश्वचषकापूर्वीच्या शेवटच्या मालिकेत छाप सोडेल
विश्वचषकापूर्वीच्या या शेवटच्या टी-२० मालिकेत भारतीय क्रिकेटपटू आपली योग्यता सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. यानंतर आयपीएलच्या माध्यमातून कोअर ग्रुपमध्ये समाविष्ट क्रिकेटपटूंच्या कामगिरीच्या आधारे विश्वचषकासाठी संघ निवडला जाईल. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकात पॉवर प्लेमध्ये भारतीय संघाला ज्या प्रकारे झटपट सुरुवात करून दिली, तशीच कामगिरी येथे करण्याची जबाबदारी रोहितवर असेल.
फिनिशर म्हणून रिंकू जबाबदारी घेईल
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत, फिनिशर म्हणून आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची जबाबदारी युवा रिंकू सिंगवर असेल. दक्षिण आफ्रिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. येथेही त्याने पुन्हा एकदा कामगिरी केल्यास टी-२० विश्वचषकासाठी संघातील त्याची निवड जवळपास निश्चित मानली जाईल. दक्षिण आफ्रिकेतून अचानक पुनरागमन केल्यानंतर इशान किशनच्या जागी विदर्भाच्या जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यापैकी एकाला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळेल. जितेशला संजूच्या आधी संधी मिळू शकते. गेल्या दोन मालिकांपासून तो संघात आहे. हार्दिकच्या जागी शिवम दुबेला संधी मिळू शकते. कुलदीप यादव फिरकी विभागाचे नेतृत्व करेल.
हेही वाचा: हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपांसाठी ‘या’ क्रिकेटपटूंना घडलाय तुरुंगवास
अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणाला– राशिदची उणीव आम्हाला जाणवेल
“राशिद खान संघात नसल्यामुळे आम्हाला संघर्ष करावा लागेल, त्याची उणीव आम्हाला जाणवेल,” असे मत अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झादरानने व्यक्त केले. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे इब्राहिमचे म्हणणे आहे. आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. इतर खेळाडूंना पुढे येऊन स्वत:ला सिद्ध करावे लागेल, असे तो म्हणतो. मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक हेही संघात आहेत.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग–११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान: हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झादरान (कर्णधार), नझीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमझाई, मुजीब-उर-रहमान, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, नूर अहमद/नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.