ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्ध वन-डे मालिकेची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, वॉर्नरने शतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत असताना, वॉर्नरने वानखेडे मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. वॉर्नरने ११२ चेंडूत नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

या खेळीदरम्यान वॉर्नर सचिनचचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला विक्रम मोडण्यासाठी केवळ दोन पाऊल दूर आहे. सलामीवीर या नात्याने सचिनने ४५ शतकं झळकावली असून वॉर्नरचं भारताविरुद्धचं हे ४३ वं शतक होतं. फिंच आणि वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी २५८ धावांची अभेद्य भागीदारी केली.

दरम्यान, दोन्ही सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात आक्रमक केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. अर्धशतकी भागीदारीचं दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारीत रुपांतर केलं. भारताचा एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना माघारी धाडू शकला नाही. वॉर्नरने या सामन्यात नाबाद १२८ तर फिंचने नाबाद ११० धावा केल्या.

Story img Loader