Mohammed Shami caught Mitchell Marsh in the first over: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्या षटकांत विकेट्स घेत आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला.
मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाला दिला मोठा धक्का –
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला चार धावांच्या स्कोअरवर पहिला झटका बसला. मिचेल मार्श चार चेंडूत चार धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला स्लीपमध्ये शुबमन गिलकरवी झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने ७ षटकांनंतर १ बाद २७ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ १३ आणि डेव्हिड वार्नर ६ धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला नाही –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम चांगला नाही. दोन्ही संघांमध्ये एकूण १४६ सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने ५४ आणि ऑस्ट्रेलियाने ८२ जिंकले आहेत. त्याच वेळी, १० सामने अनिर्णित राहिले. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये ६७ वनडे सामने झाले आहेत. भारताने ३० सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने ३२ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पाच सामने अनिर्णित राहिले. मोहालीच्या मैदानावर दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले असून ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने केवळ एकच सामना जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाला आकडे सुधारण्याची संधी आहे.
हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियन दिग्गजांना नेट प्रॅक्टिसमध्ये आपल्या गोलंदाजीने चकीत करणारा, कोण आहे समीर खान?
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.
भारत: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.