India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने हा सामना जिंकल्यास तो वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने डेव्हिड वॉर्नरचा झेल सोडला आणि त्याने अर्धशतक केले.

ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मिचेल मार्शच्या रूपाने त्यांना चार धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरला. त्यांच्यात ९४ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भक्कम भागीदारी झाली. त्या दरम्यान १४ धावांवर श्रेयस अय्यरने डेव्हिड वॉर्नरला जीवदान दिले. मिडऑफला शार्दुलच्या चेंडूवर श्रेयसने सोपा झेल सोडला. श्रेयसची ही चूक टीम इंडियाला महागात पडली आहे आणि त्याने त्यानंतर अर्धशतक केले. शेवटी रवींद्र जडेजाने त्याला शुबमन गिलकरवी झेलबाद केले, तो ५३ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. यामुळे अय्यरच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सामन्यात काय झाले?

११२ धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. स्टीव्ह स्मिथ ६० चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. मोहम्मद शमीने त्याला क्लीन बोल्ड केले. आता कॅमेरॉन ग्रीन मार्नस लॅबुशेनसह क्रीजवर आहे. २२ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११४/३ आहे. तत्पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात लोकेश राहुल भारताचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असल्याचे राहुल म्हणाला. या कारणास्तव त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; अश्विन-श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन, पाहा प्लेईंग-११

दोन्ही संघांची प्लेईंग-११

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅडम झाम्पा.

भारत: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

Story img Loader