India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा योग्य ठरवताना संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलिया पहिला धक्का दिला. त्याने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. हेडच्या विकेटनंतर आता स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श क्रीजवर आहेत.

हेड शॉट मारायला गेला आणि सिराजचा चेंडू झाला स्विंग –

आयसीसी क्रमवारीनुसार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला गोलंदाज मोहम्मद सिराज प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करत आहे. वानखेडेवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सिराजला संघासाठी दुसरे षटक टाकावे लागले. सिराजने येताच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. ज्यामुळे ट्रॅव्हिस हेड अस्वस्थ झाला आणि शॉट मारण्यासाठी पुढे गेला.

ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ट्रॅव्हिस शॉट लगावण्यासाठी पुढे सरसावला. पण सिराजने त्याची योजना ओळखली आणि चेंडू स्विंग करत त्याने सरळ स्टंपच्या दिशेने टाकला, ज्यामुळे हेडने चकवा खाल्ला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. ट्रॅव्हिस हेडने १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५ धावा केल्या.

सामन्याबद्दल बोलायचे, तर ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्शने संघाचा डाव सावरला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने १० षटकाच्या समाप्तीनंतर १ बाद ५९ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्शने दुसऱ्या विकेटसाठी ५० चेंडूत नाबाद ५४ धावांची भागीदारी केली आहे. त्याचबरोबर कर्णधार स्मिथ १६ (२२) आणि मिचेल मार्श ३१ (२८) धावांवर खेळत आहेत.

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

हेही वाचा – Rohit Ritika Dance: रोहित शर्माने मेहुण्याच्या लग्नात केली धमाल; पत्नी रितिकासोबत पंजाबी गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

Story img Loader