ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर येण्याऐवजी लोकेश राहुलला बढती दिली. राहुल आणि धवन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. धवन माघारी परतल्यानंतर, विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
अवश्य वाचा – Ind vs Aus : छोटेखानी खेळीत गब्बर-हिटमॅनची जोडी चमकली, मानाच्या यादीत स्थान
मात्र पहिल्या सामन्यात विराट आपली फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू झॅम्पाच्या गोलंदाजीवर विराट १६ धावा काढून झेलबाद झाला. वन-डे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाची जागा ही विराटसाठी फारशी लाभदायक ठरत नाहीये. गेल्या सात सामन्यांमधील आकडेवारी पाहिली की याचा अंदाज येईल…
Kohli’s
Last 7 Odi innings while batting at No.4
9, 4, 3*, 11, 12, 7, 16#INDvAUS
— CricBeat (@Cric_beat) January 14, 2020
दरम्यान, रोहित शर्मा – शिखर धवन जोडी भारताला भक्कम सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली असली तरीही या जोडीने एक विक्रम आपल्या नावे जमा केला. एखाद्या संघाविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या जोडीत रोहित-शिखर धवन ही जोडी दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. दरम्यान, २०२० वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी वन-डे सामन्यांची मालिका ही भारतीय संघासमोरचं पहिलं मोठं आव्हान असणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. त्यामुळे भारतीय संघ आता कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताचा ‘गब्बर’ झाला एक हजारी मनसबदार