IND vs AUS 1st T20 Match: विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीएसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर कोणाला मदत मिळेल, फलंदाज किंवा गोलंदाज याबाबत आपण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाखापट्टणम खेळपट्टी अहवाल

विशाखापट्टणम म्हणजेच विझागची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य मानली जाते, परंतु या खेळपट्टीवर झालेल्या तीन टी-२० सामन्यांवर जर नजर टाकली तर आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. २०१६ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये श्रीलंकेचा संघ अवघ्या ८२ धावांत सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी ७ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ १२६ धावा करू शकला आणि अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना समान मदत मिळाली आहे. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० मध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना १७९ धावा केल्या आणि भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना १३१ धावांत गुंडाळले.

हेही वाचा: ICC Rankings: वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीमुळे विराट -रोहितचे प्रमोशन, आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप

अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही मदत मिळणे अपेक्षित आहे. जर नाणेफेकीबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तर तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून विजय मिळवला.

कसे असेल विशाखापट्टणमचे हवामान?

वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, गुरुवारी विशाखापट्टणममध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यात पाऊस आणि ढगाळ आकाश राहण्याची १० टक्के आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी पावसाच्या अधूनमधून सरी येतील.

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये कशी असेल भारताची प्लेइंग-११? जाणून घ्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील आकडेवारी

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात १० टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ भारताने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकले आहेत. म्हणजेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टी-२० क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १० द्विपक्षीय टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा वरचष्मा असून ५-२ ने आघाडीवर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० पैकी ५ टी-२० मालिका जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने २ टी-२० मालिका जिंकल्या आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. भारताने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची टी-२० मालिका २-१ ने जिंकली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st t20 how is the pitch of visakhapatnam who will get help bowler or batsman know avw
Show comments