ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटी (IND vs AUS) पहिल्या दिवशी सर्व काही भारताच्या बाजूने राहिले. पण उपकर्णधार केएल राहुलची कामगिरी निराशेचे कारण ठरली. पहिल्या डावात राहुलची खेळी अतिशय संथ होती. कारण एका बाजूने स्वत: कर्णधार रोहित शर्मा वेगाने धावा करत होता. त्यामुळे माजी खेळाडू आकाश चोप्रानेही भारतीय उपकर्णधाराच्या संथ खेळीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीत विशेष कामगिरी दिसून आली नाही. कारण संघाला केवळ १७७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवस अखेर १ विकेट गमावून ७७ धावा केल्या. भारताने केएल राहुलची एकमेव विकेट गमावली, ज्याने ७१ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. त्याला टॉड मर्फीने सोपा झेल घेत बाद केले. त्यामुळे ५६ धावा करून नाबाद असलेला रोहित बाद झाल्यानंतरही खूप निराश झाला.

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या डावाचा आढावा घेतला. तो म्हणाला की, दोन्ही भारतीय सलामीवीर वेगवेगळ्या पद्धतीने खेळले. आकाश चोप्रा म्हणाला, ”ही खेळपट्टी १७७ धावांची नव्हती, किमान २७५ धावा व्हायला हव्या होत्या. रोहित शर्माने आपल्या बॅटने ते दाखवून दिले आणि पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात धावा गोळा केल्या. दुसऱ्या टोकाला केएल राहुल खूप संथ खेळत होता. तो असा का खेळत होता? हा एक प्रश्न आहे.”

केएल राहुलने बरेच दिवस धावा केल्या नाहीत. गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या कसोटी मालिकेतही त्याची बॅट शांत होती. त्यामुळे त्याच्यावर नक्कीच दडपण आहे. त्यामुळे राहुल आपली जागा पक्की करण्यासाठी खेळत असावा, असे आकाश चोप्राला वाटते.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: ‘या’ भारतीय खेळाडूला लाबुशेन मानतो गुरु; म्हणाला, मी त्याच्याकडून शॉट खेळायला शिकलो

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ”त्याच्याकडे (केएल) बरेच शॉट्स आहेत. तो उपकर्णधार असला तरी कदाचित त्याच्या मनात अशी भावना असेल की, त्याचे स्थान धोक्यात आहे. त्यामुळे त्याला सांभाळून खेळण्याची गरज आहे. केएल राहुल माझा आवडता खेळाडू आहे. तुम्ही म्हणता की मी पक्षपाती आहे, पण तो एकदम सोप्या पद्धतीने बाद झाला.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st test akash chopra raises question about kl rahuls slow innings vbm
Show comments