Ashwin vs Marnus: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सुरू आहे. गुरुवारी (९ फेब्रुवारी) बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात नाणेफेक पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकली. पण त्यांच्या संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला.
कसोटी क्रिकेट दरम्यान, खेळाडू एकमेकांशी मनाचे खेळ खेळतात. ऑस्ट्रेलिया हा अशा संघांपैकी एक आहे ज्यांनी मनाचा खेळ खेळून अनेक सामने जिंकले आहेत. बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाची ही रणनीती कामी येणार असली, तरी ती खूपच अवघड दिसते. वास्तविक, याचे कारण भारतीय संघात आता एक असा खेळाडू आहे ज्यात कांगारूंना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्याची ताकद आहे. होय, आम्ही बोलत आहोत भारतीय ऑफस्पिनर आणि मास्टर माइंड रविचंद्रन अश्विनबद्दल.
अश्विन आणि मार्नस यांच्यात स्लेजिंग सुरू झाले
रविचंद्रन अश्विन भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियासाठी सर्वात धोकादायक गोलंदाज ठरू शकतो. या खेळाडूने नागपूर कसोटीत पहिल्याच षटकात ते करून दाखवले. खरे तर अश्विन गोलंदाजी करायला आला तेव्हा मार्नस समोर असताना अशी घटना घडली. येथे अश्विनने आपल्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला पायचीत केले. मार्नसला चेंडूची ओळही वाचता आली नाही.
इथे मार्नसची चूक होताच रविचंद्रन अश्विनने फलंदाजासोबत मनाचा खेळ खेळला. अश्विन मार्नसला हातवारे करत काहीतरी बोलताना दिसला आणि यादरम्यान त्याने बोट फिरवून फलंदाजाकडे इशारा केला. इकडे मार्नसनेही अश्विनला पाहून प्रतिक्रिया व्यक्त केली, पण अश्विनसमोर चांगला सेट असलेला फलंदाज थोडा हैराण झाल्याचे स्पष्ट झाले.
महत्त्वाचे म्हणजे, मार्नस लबुशेन हा पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आला आहे. २८ वर्षीय मार्नस त्याच्या आदर्श स्टीव्ह स्मिथप्रमाणेच फलंदाजी करतो, त्यामुळे अश्विन पाहुण्यांसाठी धोका आहे, तर दुसरीकडे मार्नस यजमानांसाठी धोकादायक ठरू शकतो. उपहारानंतर ऑस्ट्रेलियन जोडी स्मिथ-लाबुशेन मैदानावर आले असून दोघेही टिच्चून खेळत होते. लाबुशेनचे अर्धशतक झाले असते पण त्याला जडेजाने ४९ धावांवर बाद झाला. भरतने काही सेकंदात यष्टिचीत केले.