India vs Australia 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षीत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला गुरुवारपासून (९ फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. उभय संघांतील या चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चर्चा करून पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडतील. कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय संघातील भारताच्या दोन खेळाडूंचे आज कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे.
नागपूर कसोटी पाहण्यासाठी तब्बल ४० हजार तिकीट विकले गेले आहेत त्यामुळे आयपीएलमुळे भारतातील कसोटी क्रिकेट संपत चालले याला चोख प्रत्युतर मिळाले आहे. भारतीय संघ घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलून पाहुण्यांवर विजय मिळवण्यासाठी जोर लावणार आहेत. ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्याचं टीम इंडियाचं ध्येय आहे. त्याचसोबत भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावता येणार आहे. त्यामुळेच या मालिकेची भारतीयांना अधिक उत्सुकता आहे.
सूर्यकुमार यादव आणि के एस भरतचे पदार्पण
आजच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची सर्वांना उत्सुकता होती, टीम इंडियात आज दोन खेळाडूंना संघात पदार्पणाची संधी मिळाली. त्यात भारताचा ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणारा सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक के एस भरत यांना संघात स्थान देण्यात आले. २०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला.
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कॅमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना किमान ३०० धावांच्या आता रोखणे अधिक गरजेचे आहे. कारण शेवटी फलंदाजी भारताला करायची आहे. त्यामुळे खेळपट्टी ही फिरकीपटूंना साथ देणारी आहे. लाल मातीची ही खेळपट्टी असून कशी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी खेळाडूंच्या घरून कुटुंबीय देखील आले होते. त्यात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला असून उस्मान ख्वाजा बाद झाला त्याला मोहम्मद सिराजने पायचीत केले.