Akshar Patel: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस असून भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने कांगारूंना पाणी पाजत शानदार ८४ धावांची खेळी केली. त्याचे कसोटीतील पहिले मेडन शतक मात्र हुकले. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात १७७ धावांत आटोपला होता. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सात गडी गमावून ३२१ धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात ४०० धावांचा डोंगर उभारत २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली असून ऑस्ट्रेलिया या सामन्यात पराभवाच्या दारात उभा आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने अक्षर पटेलला त्रिफळाचीत करून भारताचा डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याच्या खेळीत १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अक्षरचे शतक नक्कीच हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने २२३ धावांची आघाडी घेतली. नागपूरच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळत असून ही धार निर्णायक ठरू शकते.

IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल ही जोडी खेळपट्टीवर होते. दोघेही आज आपले शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी झाले. जडेजा १८५ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने ताबडतोड फलंदाजी करत ३७ धावा केल्या. जर भारतीय संघाला पहिल्या डावात २०० धावांची आघाडी मिळवता आली तर तो ऑस्ट्रेलियालाही डावाच्या फरकाने पराभूत करू शकतो. अशी शक्यता सकाळी रवी शास्त्री यांनी व्यक्त केली होती आणि तसेच करत टीम इंडियाने २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली. मात्र, आता लवकरात लवकर कांगारूंना बाद करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: IND vs AUS: जडेजाविरुद्धचा तो डीआरएस अन् रोहित शर्माची ती खास रिअ‍ॅक्शन, यामुळे कांगारू आणखीनच चिडले, Video व्हायरल

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. ४९ धावा करणारा मार्नस लबुशेन संघाचा सर्वोत्कृष्ट स्कोअरर ठरला. स्टीव्ह स्मिथने ३७ आणि अ‍ॅलेक्स कॅरीने ३६ धावा केल्या. भारताकडून जडेजाने पाच आणि अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर भारताने सात गडी गमावून ३२१ धावा केल्या होत्या. भारतीय कर्णधार रोहित शर्मा १२० धावांची शतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याचवेळी रवींद्र जडेजा ६६ आणि अक्षर पटेल ५२ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने ५ विकेट्स घेतल्या.

Story img Loader