टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने नागपुरात ऑस्ट्रेलियाला वाईट पद्धतीने पराभूत करण्यात महत्वाची भूमिका निभावली. आर आश्विनने या विजयाचे श्रेय बॅटिंग युनिटला दिले. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाबद्ल एक मोठा दावा केला आहे. अश्विनने म्हणाला आशा आहे की ऑस्ट्रेलिया खरोखरच कठीण आणि मजबूत पुनरागमन करेल.
रविचंद्रन अश्विनने विजयाचे अधिक श्रेय फलंदाजांना दिले.
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुन पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. या विजयाचे श्रेय आश्विनने बॅटिंग युनिटला दिले. आश्विन म्हणाला, “मी बॅटिंग युनिटला श्रेय देऊ इच्छितो, त्यांनी बराच वेळ फलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला बराच वेळ मैदानावर राहण्यास भाग पडले. त्यानंतर कोणत्याही संघासाठी मैदानात उतरून फलंदाजी करणे सोपे नसते.”
हेही वाचा – IND vs AUS 1st Test: वसीम जाफरने उडवली ऑस्ट्रेलिया संघाची खिल्ली, ट्विट करत नव्या पद्धतीने शिकवली ABCD
पुढील सामन्याची वाट पाहत आहे – अश्विन
सामन्यानंतर अश्विनने आपल्या वक्तव्यात सांगितले की, ”या सामन्यात आम्ही फक्त चांगली फलंदाजी केली. त्याचबरोबर आज खोलवर फलंदाजीही केली. २२० खूप धावा आहेत. पुढचा सामना वेगळा असेल, मी त्याची वाट पाहत आहे. आज लवकर विकेट मिळाल्याने मला चांगली लय मिळाली.” आर आश्विन पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर तो सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. अश्विननेही फलंदाजीत २३ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यात अश्विनचा मोलाचा वाटा होता.
जडेजा मॅन ऑफ द मॅच ठरला –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर फलंदाजीतही जडेजाची बॅट तळपली. जडेजाने भारतासाठी ७० धावांचे योगदान दिले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा – IND vs AUS: नॅथन लायनचा मोठा पराक्रम; १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
त्याचवेळी, भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने १२० आणि अक्षर पटेलने ८४ धावा केल्या. त्याचबरोबर जडेजा आणि अश्विनने गोलंदाजीतही कमाल केली. जडेजाने ७ तर अश्विनने ८ बळी घेतले. पाहुण्या संघाकडून नवोदित गोलंदाज टॉड मर्फीने ७, कर्णधार पॅट कमिन्सने २ आणि नॅथन लायनने एक विकेट घेतली.