भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. नागपूरच्या स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. ही मालिका जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूर खेळपट्टीवरुन गंभीर आरोप केले होते, ज्यावर रोहित शर्माने प्रतिक्रिया देताना त्यांची बोलती बंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला अजून सुरुवातही झालेली नाही, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि तिथल्या मीडिया आधीच खेळपट्टीबाबत चिंतेत आहे. त्यामुळे ते काहीही वक्तव्य करत आहेत. त्यांना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले.

खेळपट्टीच्या प्रश्नावर रोहित शर्माने चोख उत्तर दिले –

खरे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात नागपूरची खेळपट्टी हा सर्वात मोठा मुद्दा ठरत आहे. खेळपट्टीबाबत अनेक तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पत्रकार परिषदेत रोहित शर्मालाही याबाबत विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्याने ऑस्ट्रेलियन मीडियाची मजा घेतली.

आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे –

रोहित शर्माने उत्तर दिले की, ”आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उद्या जे २२ खेळाडू खेळतील, ते सर्व दर्जेदार क्रिकेटपटू आहेत. त्यांना चांगले क्रिकेट खेळावे लागेल.” तसेच अशा बातम्या येत होत्या की, राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित हे दोघेही नागपूरच्या खेळपट्टीवर फारसे प्रभावित नाहीत. त्यामुळे दोघांनीही त्यात बदल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाचा भारतावर गंभीर आरोप; म्हणाले, ”फोटोंनीच भारताचा डाव…”

त्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितने आपल्या चार फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले. रोहित म्हणाला, ”आमचे चारही फिरकीपटू दर्जेदार फिरकीपटू आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी एकत्र भरपूर क्रिकेट खेळले आहे, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनीही जेव्हा संधी मिळाली तेव्हा चांगली कामगिरी केली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st test rohit sharma said in the press conference that we want to focus on the game vbm