भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस आज आहे. भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आक्रमक खेळण्याच्या नादात बाद झाला. तो चुकीचा शॉट खेळताना अवघ्या ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे रोहित शर्मादेखील नाराज झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव ६३.५ षटकांत १७७ धावांतच आटोपला. मात्र, त्यानंतर भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा टीम इंडियाच्या राहुल आणि पुजारा या फलंदाजांनी कर्णधार रोहितचा विश्वास तोडून फ्लॉप परफॉर्मन्स दिला.

चेतेश्वर पुजारा हा नेहमी संयमी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु आज (गुरुवारी) पुजाराचा नवा अवतार पाहिला मिळाला. कारण नेहमी खातं उघडायला ५० चेंडू घेणाऱ्या पुजाराने आज चौथ्याच चेंडूवर चौकार मारुन सर्वांना चकित केले. मात्र त्यानंतर तो चुकीचा शॉट खेळून बाद झाला. टी मर्फीच्या गोलंदाजीवर बोलंडने त्याचा झेल घेतला. ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मादेखील नाराज दिसून आला. त्याने पुजारा बाद झाला म्हणून पॅडवर बॅट मारुन घेतली.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: टिकाकारांच्या रडारवर असलेल्या राहुलला हरभजनचा सल्ला; म्हणाला, तू फक्त ‘हे’ कर

भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ५२ षटकानंतर १५१ धावा केल्या. ज्यामध्ये केएल राहुलने ७१ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. त्याचबरोबर आर आश्विन २३ (६२) आणि पुजारने ७(१४) धावा केल्या. सध्या खेळपट्टी रोहित शर्मा आमि विराट कोहली आहेत. दोघे अनुक्रमे ८५ आमि १२ धावांवर खेळत आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st test rohit sharma was upset when cheteshwar pujara was dismissed after playing a wrong shot vbm
Show comments