भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण रोहित शर्माचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघ आपला दुसरा डाव खेळत होता. ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स कॅरीला आर अश्विननं बाद केलं. पण त्याने रिव्ह्यू घेतला, ज्यावेळी संपूर्ण भारतीय संघ थर्ड अंपायरचा रिव्ह्यू पाहत होता, त्याचवेळी स्टेडियममधील स्पायडर कॅम रोहित शर्माच्या दिशेने आला. स्पायडर कॅम आपल्या दिशेने येताना पाहून रोहित म्हणाला ‘मेरी तरफ क्या दिखा रहा रिव्हू दिखा.’ त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि भारतीय कर्णधाराच्या आसपास असलेले इतर खेळाडू हे ऐकून हसू लागले.

तेव्हापासून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच पाहुण्या संघाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४०० धावा केल्या आणि २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी एकही सत्र खेळू शकला नाही तसेच ९१ धावांवर आटोपला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची ही दुसरी छोटी धावसंख्या होती.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा! भारताचा एक डाव अन १३२ धावांनी दणदणीत विजय

त्याचवेळी, भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने १२०, रवींद्र जडेजाने ७० आणि अक्षर पटेलने ८४ धावा केल्या. त्याचबरोबरजडेजा आणि अश्विनने गोलंदाजीतही कमाल केली. जडेजाने ७ तर अश्विनने ८ बळी घेतले. पाहुण्या संघाकडून नवोदित गोलंदाज टॉड मर्फीने ७, कर्णधार पॅट कमिन्सने २ आणि नॅथन लायनने एक विकेट घेतली.