Border Gavaskar Trophy IND vs AUS Toss and Playing 11 Update: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दुसऱ्यांदा जसप्रीत बुमराह भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स नाणेफेकीसाठी उपस्थित होते. याशिवाय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला ज्या दोन दिग्गजांच्या नावावरून नाव पडलं ते भारताचे सुनील गावस्कर आणि एलन बॉर्डरही नाणेफेकीसाठी मैदानात होते. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणाने कसोटीत पदार्पण केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटीत ३ खेळाडूंनी पदार्पण केले आहे. यामध्ये भारतीय संघातून २ खेळाडूंनी पदार्पण केले आहे. नितीश रेड्डीला विराट कोहलीने तर हर्षित राणाला आर अश्विनने पदार्पणाची कॅप दिली. तर एका खेळाडूने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीराची भूमिका बजावणारा नॅथन मॅकस्विनीने पदार्पण केले आहे. जसप्रीत बुमराहने प्लेईंग इलेव्हन जाहीर करताच मोठा धक्का दिला. तो म्हणजे भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना संधी दिली. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय फिरकीपटू म्हणून सर्वाधिक विकेट असणाऱ्या दिग्गज फिरकीपटूंपेक्षा वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे.
शुबमन गिलला सराव सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून अद्याप सावरला नसून पहिल्या कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही, अशी अपडेट बीसीसीआयने दिली आहे. त्याच्या या दुखापतीवर संघ व्यवस्थापनाचे लक्ष असून दुसऱ्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन परिस्थितीत टीम इंडियाला वेगवान गोलंदाजांची गरज भासणार आहे. तर नितीश कुमार रेड्डी हा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून त्याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. नितीश कुमार रेड्डी यांच्यासाठी हा खूप खास क्षण होता. ऑस्ट्रेलियासारख्या कठीण परिस्थितीत भारतासाठी फार कमी खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज हर्षित राणालाही पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
े
पर्थ कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन (India Playing 11 For IND vs AUS Perth Test)
जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड