भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात होत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राच्या मध्यभागी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅट रेनशॉ दुखापत झाली आहे. मॅट रेनशॉच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याच्या जागी अॅश्टन एगर क्षेत्ररक्षण करत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉने समालोचन करताना म्हणाला, “मला माहित नाही की हे किती गंभीर आहे, परंतु तो मैदानावर नसणे हे चांगले लक्षण नाही. मी ऐकले आहे की त्याला सावधगिरीसाठी स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला त्याची गरज आहे, पण या खेळाडूची दुखापत ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असेल.”

IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
India vs South Africa 1st T20 Live Updates in Marathi
IND vs SA 1st T20 Highlights: दक्षिण आफ्रिका ऑलआऊट, भारताचा पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सिडनी कसोटीत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे रेनशॉने नागपुरातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपले स्थान कायम ठेवले. ट्रॅव्हिस हेड उपलब्ध नसल्याने पीटर हँड्सकॉम्बलाही मधल्या फळीत फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. पहिल्या डावात अवघ्या १७७ धावांत गुंडाळल्यानंतर नागपूर कसोटीत पुनरागमन करण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: रोहितने धोनी-विराटला न जमलेला केला विक्रम; ‘हा’ कारनामा करणारा जगातील चौथा खेळाडू ठरला

दुसऱ्या डावात रेनशॉच्या फलंदाजीच्या उपलब्धतेबाबत ऑस्ट्रेलियाला चिंता असेल. ऑस्ट्रेलिया आधीच अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशिवाय नागपूर कसोटी खेळत आहे, जोश हेझलवूड देखील अनुपलब्ध आहे.

हेही वाचा – IND vs AUS: आज बहुधा बायको नक्की रागावणार! live सामन्यादरम्यान विराटवर विशेष प्रेम दाखवणारे चाहत्याचे पोस्टर व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ९९ षटकानंतर ७ बाद २८२ धावा केल्या. सध्या खेळपट्टीवर रवींद्र जडेजा (५७) आणि अक्षर पटेल (२२) खेळत आहेत. भारताकडून सर्वाधिक रोहित शर्माने केल्या. त्याने २१२ चेंडूचा सामना करताना १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावांचे योगदान दिले. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून शानदार गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पॅट आणि लायनने प्रत्येकी १ विकेट घेतली.