Virat Kohli criticized by fans : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे थोडेसे चुकीचे सिद्ध झाले असून टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या चार मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत. पर्थमध्ये विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण पुन्हा एकदा कोहलीने संघ आणि चाहत्यांची निराशा केली. कोहलीचा फ्लॉप शो पाहून चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.

विराट ५ धावा करून बाद –

या सामन्यात विराट कोहली क्रीजच्या बाहेर उभा राहून खेळताना दिसला. तो जोश हेझलवूडच्या अतिरिक्त उसळत्या चेंडूवर कोहलीने चूक केली. जोश हेझलवूडच्या अतिरिक्त उसळत्या चेंडूवर कोहली स्लिपमध्ये झेलबाद झाला. अशा प्रकारे पहिल्या डावात अवघ्या ५ धावा करून कोहली बाद झाला. यानंतर चाहत्यांचा संताप दिसून येत आहे. गेल्या वेळी जेव्हा विराट कोहली पर्थमध्ये खेळला होता, तेव्हा चाहत्यांना त्याच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर कोहलीच्या क्रीजबाहेर खेळण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

IND vs AUS Cheteshwar Pujara explains Virat Kohli’s biggest mistake that led to his dismissal in the first innings of the Perth Test Watch Video
IND vs AUS: विराट कोहली स्वत:च्या चुकीमुळे ‘असा’ झाला बाद, चेतेश्वर पुजाराने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
eknath shinde devendra fadnavis (1)
महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
KL Rahul Controversial Dismissal Despite No Conclusive Evidence by Third Umpire IND vs AUS 1st Test
KL Rahul Wicket Controversy: केएल राहुल आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांनी घाईत दिला निर्णय अन् राहुलच्या विकेटमुळे सुरू झाला नवा वाद
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

सात वर्षात पहिल्यांदाच असं घडलं –

सात वर्षात पहिल्यांदाच विराट कोहलीने जोश हेझलवूडच्या उसळत्या चेंडूचा चुकीचा अंदाज लावला आणि त्याची विकेट गमावली. त्यामुळे भारतीय टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने चार विकेट्स गमावल्या. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम असून, सात वर्षांत प्रथमच कोहलीला सलग पाच डावांत २० धावांचा टप्पा गाठण्यात अपयश आले आहे. कोहलीने त्याच्या शेवटच्या पाच डावांमध्ये ५, १, ४, १७ आणि १ अशा स्कोअरसह केवळ २८ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार

विराटच्या फ्लॉप शोमुळे वैतागलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया –

विराटची गेल्या ९ डावातील कामगिरी –

कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीची बॅट बराच काळ शांत असल्याचे दिसते. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही विराटचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्याच्या गेल्या ९ डावांबद्दल बोलायचे झाले, तर कोहलीच्या बॅटमधून फक्त १७४ धावा झाल्या आहेत. ज्यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.