India vs Australia 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून ३९९ धावा केल्या. दरम्यान या सामन्यातील केएल राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय कर्णधार केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार षटकार ठोकला आहे. हा षटकार इतका लांब होता की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियासाठी आधीच षटकार ठोकत होते. अय्यर बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी होईल, असे वाटत होते. पण राहुलने येताच आपले इरादे स्पष्ट केले. राहुलने हा षटकार असा मारला की ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राहुलने स्टेडियमच्या बाहेर पाठवला चेंडू –
राहुलने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर हा षटकार मारला. राहुल ९ चेंडूत ११ धावांवर खेळत होता. त्यानंतर वेगवान गोलंदाज ग्रीनला ३४ वे षटक टाकण्यासाठी पाठवण्यात आले. ग्रीनने ओव्हरचे दोन चेंडू टाकले, पण पुढचा चेंडू ग्रीनने टाकता राहुलने खणखणीत षटकार मारत चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर पाठवला. केएल राहुल आधीच मोठ्या शॉर्टसाठी तयार होता. आपल्या जागेवर उभा राहून राहुलने जोरदार बॅट फिरवली आणि बॉल स्टेडियमच्या बाहेर दर्शनासाठी पाठवला. हा षटकार ९४ मीटरचा होता. आता व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: शुबमन गिलने हाशिम आमलाचा विक्रम मोडत रचला इतिहास, झळकावले वनडेतील सहावे शतक
कर्णधार केएल राहुलने झळकावले दमदार अर्धशतक –
भारताला ४६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाचवा धक्का बसला. कर्णधार केएल राहुल भारताच्या ३५५ धावसंख्येवर बाद झाला. त्याला कॅमेरून ग्रीनने क्लीन बोल्ड केले. राहुलने ३८ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५२ धावांची वादळी खेळी केली. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. तो शतकानंतर १०५ धावा काढून बाद झाला. त्याने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.