India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिला वनडे पाच गडी राखून जिंकला होता. अशा परिस्थितीत आज विजय मिळवून टीम इंडिया मालिकेत अजेय आघाडी घेण्याच्या इराद्याने उतरली होती. मात्र प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय फलंदाजांची मिचेल स्टार्कसमोर भंबेरी उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरेलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाला पहिला झटका, पहिल्याच षटकात बसला. युवा फलंदाजा शुबमन गिल भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या षटकांत बाद झाला. त्याने १५ चेंडूत १३ धावांचे योगदान दिले. त्याच्यापाठोपाठ दुसरा मुंबईकर सूर्यकुमार मागील सामन्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवर यादव बाद झाला. तो बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या पाच षटकानंतर ३ बाद ३२ अशी होती.

दरम्यान ४ विकेट गेल्यानंतर भारतीय संघाच्या डावाची जबाबदारी राहुल आणि विराट आली होती. परंतु मागील सामन्यातील तारणहार केएल राहुलसुद्धा चौथ्या विकेटच्या रुपाने तंबूत परतला. त्याने १२ चेंडूत ९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेला उपकर्णधार हार्दिका पांड्या देखील लवकर बाद झाला. तो फक्त एक धाव काढून बाद झाला. त्यामुळे १० षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ५ बाद ४९ अशी झाली.

हेही वाचा – MS Dhoni: ४१ व्या वर्षीही धोनी कसतोय कंबर, फिटनेसचं रहस्य आलं समोर, रॉबिन उथप्पाने सांगितला डाएट प्लॅन

मिचेल स्टार्कचा धमाका –

मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलिया संघाकडून शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्या पाचपैकी चार विकेट एकट्याने घेतल्या. ज्यामध्ये त्याने शुबमन गिल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर सीन अबॉटने हार्दिक पांड्याला तंबूत धाडले.

हेही वाचा – Chris Gayle: १७५ धावांचा विक्रम कोण मोडणार? स्वत: ख्रिस गेलने सांगितले ‘या’ खेळाडूचे नाव

भारतीय संघाचा डाव अडचणीत –

भारतीय संघाने १३ षटकाच्यानंतर ५ बाद ६५ धावा केल्या आहे. सध्या खेळपट्टीवर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा आहेत. दोघे संघाचा डाव सावरण्यासाठी संघर्ष करत आहेत. विराट कोहली (३०) आणि रवींद्र जडेजा (८) धावांवर नाबाद आहेत.