भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना पार पडला. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने चेतेश्ववर पुजारा एक खास भेटवस्तू दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर चेतेश्वर पुजाराला पॅट कमिन्सने भारतासाठी कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केल्याबद्दल ऑस्ट्रेलिने खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी दिली. आपल्या १००व्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात पुजाराने संघासाठी विजयी धावा फटकावल्या.

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराची १०० वी कसोटी संस्मरणीय ठरली. कारण अनुभवी फलंदाज चौथ्या डावात संघ अडचणीत असताना खेळपट्टीवर आला. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ज्यामुळे मालिकेत यजमानांसाठी हा लागोपाठ दुसरा विजय ठरला. पुजाराने दुसऱ्या डावात ७४ चेंडूचा सामना करताना नाबाद ३१ धावा केल्या.

सामन्यानंतर पुजाराला त्याच्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याकडून आदर म्हणून पॅट कमिन्सकडून स्वाक्षरी केलेली जर्सी मिळाली. ऑस्ट्रेलियन जर्सीवर उपखंडाच्या दौऱ्यावर असलेल्या सर्व पथकातील सदस्यांनी स्वाक्षरी केली. त्यावर भारतीय संघासाठी एक संदेश लिहला, “सर्व महान लढतींसाठी धन्यवाद.”

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: ‘या’ खेळाडूंना विजयाचे श्रेय देताना रोहित शर्माने सांगितले दिल्लीच्या खेळपट्टीबाबत काय होती योजना?

दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने सर्वबाद २६३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये उस्माने ख्वाजाने सर्वाधिक ८१ धावांचे योगदान दिले होते. त्याचबरोबर भारताकडून मोहम्मद शम्मीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने प्रत्युत्तरात पहिल्या डावात सर्वबाद २६२ धावा केल्या. ज्यामध्ये अक्षर पटेलने सर्वाधिक ७४ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: पुढे सरसावत फटका मारणाऱ्या विराट कोहलीला टॉड मर्फीने ‘असा’ दिला चकवा, VIDEO होतोय व्हायरल

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाचा डाव जडेजा-आश्विनने अवघ्या ११३ धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाला विजयसाठी ११५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने २६.४ षटकांत ४ बाद ११८ धावा करताना विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.