भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जात आहे. दिल्लीत सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या जडेजा-अश्विन जोडीने कांगारूंना अक्षरशः घाम फोडला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांवर आटोपला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी ११५ धावांची गरज आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाचे पाच फलंदाज स्विप रिव्हर्स स्विप मारताना बाद झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसऱ्या दिवशी ६१ धावा आणि १ गडी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने पुढे खेळायला सुरुवात केली की, भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर संपूर्ण संघ केवळ ११३ धावांतच गारद झाला. भारताकडून अश्विनने ७ तर जडेजाने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. महत्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ स्विप रिव्हर्स स्विप शॉट मारण्याचा नादात बाद झाला. ज्यामध्ये स्मिथ, रेनशॉ, कैरी, कॅमिन्स, मॅथ्यू कुनमन या पाच फलंदाजांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने ४३ आणि मार्नस लबुशेनने ३५ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तसेच ९ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आता हा दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला ११५ धावांची गरज आहे.

तत्पूर्वी, अष्टपैलू अक्षर पटेल (११५ चेंडूंत ७४ धावा) आणि रविचंद्रन अश्विन (७१ चेंडूंत ३७ धावा) यांनी आठव्या गडय़ासाठी केलेल्या ११४ धावांची भागीदारी केली. या निर्णायक भागीदारीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुनरागमन केले. भारताने पहिल्या डावात ८३.३ षटकांत २६२ धावा केल्या.

हेही वाचा –

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७८.४ षटकांत सर्वबाद २६३
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव): ३१. षटकात सर्वबाद ११३
भारत (पहिला डाव) : ८३.३ षटकांत सर्वबाद २६२