India vs Australia Delhi Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील दुसरा सामना दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सुरू होईल. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संधी मिळणार नसल्याचे बोलले जात होते. यावर त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स याने स्पष्टीकरण दिले.
मात्र दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत पुन्हा वाद सुरू झाला आहे. खेळपट्टी लपवल्याचा आरोप टीम इंडियावर होत आहे. खरं तर, स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने ऑस्ट्रेलियन मीडियाला खेळपट्टीची छायाचित्रे घेण्यास मनाई करण्याचा प्रयत्न केला. याच खेळपट्टीवर शुक्रवारपासून दोन्ही देशांमधील कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
खेळपट्टी कडेकोट देखरेखीखाली आहे
अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांनी खेळपट्टी वाचण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ग्राउंडस्टाफच्या सदस्याने फोटो काढण्यासाठी पत्रकारांनी किमान ३० मीटर अंतरावर असावे असे आदेश दिले, त्यानंतर एका रिपोर्टरला सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. जिथे त्याला फोटो काढण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीची खेळपट्टी खूप कोरडी आहे
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द एज’चे पत्रकार अँड्र्यू वू खेळपट्टीची छायाचित्रे घेण्यात यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षणादरम्यान त्याने गोलंदाजाच्या हातामागून फोटो क्लिक केला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणतो की खेळपट्टी खूप कोरडी आहे. ही खेळपट्टी नागपूरसारखी असू शकते, असे बोलले जात आहे. भारतीय क्रिकेट पत्रकार भारत सुंदरसन यांनी ट्विटरवर छायाचित्रे पोस्ट केली आहेत. तो म्हणाला, बहुतेक खेळपट्टीवर पाणी टाकत असताना, क्युरेटर्स डाव्या हाताच्या फलंदाजाच्या ऑफ स्टंपच्या बाहेरचा भाग कोरडे करण्यासाठी सोडत आहेत.
“खेळपट्टीविषयी निश्चित काही बोलता येणार नाही. ही खेळपट्टीव पूर्णपणे वेगळ्या मातीची आहे. पण त्याला आशा आहे की, ईथेही नागपूरप्रमाणेच परिस्थिती असेल. याठिकाणीही चेंडू स्पिन होण्याची शक्यता आहे,” असे कर्णधार कमिन्स पुढे म्हणाला. नागपूर कसोटीपूर्वी जेव्हा खेळपट्टीचे चित्र समोर आले तेव्हा त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंवर खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा आरोप. त्यामुळेच खेळपट्टीचा वाद अधिक गडद झाला. आता दिल्लीच्या खेळपट्टीवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.