IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून १२८ धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे अद्याप २९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघ गुलाबी चेंडूच्या कसोटीत बॅकफूटवर आहे, त्यामुळे भारतीय संघ आता किती धावांची आघाडी मिळवणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत १५७ धावांची चांगली आघाडी मिळवली. खेळाच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी टीम इंडियाचा डाव पुढे नेतील. पंत २८ धावा करून खेळत आहे तर नितीश कुमार १५ धावा करून नाबाद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या मिळून १४ विकेट पडल्या. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने १ बाद ८६ धावांवरून आपला डाव पुढे नेला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दिवसाच्या सुरुवातीला चांगली सुरुवात केली होती, पण ट्रॅव्हिस हेडने १४० धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आणि ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांचा डोंगर उभारला.

हेही वाचा – VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज फेल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करू शकली नाहीत. भारतीय संघाने निःसंशयपणे १२८ धावा केल्या आहेत, परंतु यादरम्यान त्यांनी ५ मोठ्या विकेट गमावल्या आहेत. दुसऱ्या डावात टीम इंडियाची टॉप ऑर्डकर सपशेल फेल ठरली. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली आणि शुबमन गिल पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. तर रोहित शर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निराश केले. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला आहे.

हेही वाचा – Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

भारताविरुद्ध डे नाईट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १५७ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. ॲडलेड कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ १८० धावा करू शकला. नितीश कुमार रेड्डीशिवाय टीम इंडियाच्या पहिल्या डावात इतर कोणत्याही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत.

हेही वाचा – Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

भारतासमोर दुसऱ्या कसोटीत या रेकॉर्डचं मोठं संकट

ऑस्ट्रेलियाची ही आघाडी भारतासाठी मोठी धोक्याची ठरू शकते कारण या सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या २२ दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात पिछाडीवर पडून संघ जिंकण्यात यशस्वी झाल्याचे फार कमी वेळा पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २२ दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये असे केवळ दोनदा घडले आहे जेव्हा पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर संघ पराभूत झाला आहे. म्हणजेच एकूणच भारतासाठी विजय खूप कठीण दिसत आहे.

हेही वाचा – SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल

४ वर्षांपूर्वी एखाद्या संघाने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारत विजय मिळवला. जेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी न मिळवताही २०२० मध्ये भारताविरुद्ध खेळलेली ॲडलेड कसोटी (डे-नाईट टेस्ट) जिंकली होती. त्याचबरोबर २०१८ मध्ये, पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर वेस्ट इंडिजला श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पहिल्या डावातील आघाडी गमावल्यानंतर केवळ दोनदाच संघ दिवस-रात्र कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरले

५० धावा- श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन २०१८
५३ धावा- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ॲडलेड २०२०