IND vs AUS 2nd Test India Playing XI and Toss Updates: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेड येथे खेळवला जात आहे. हा पिंक बॉल कसोटी सामना असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी ३ मोठे बदल झाले आहेत. तर रोहित शर्मा कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार हेही निश्चित झालं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीनंतर आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. भारतीय संघात जे बदल अपेक्षित होते तेच दिसले. रोहित, गिल आणि अश्विनचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना बाहेर जावे लागले आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या एक दिवस आधी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. गुलाबी चेंडू कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघातही बदल करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन संघात दुखापत झालेल्या जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलँडची निवड करण्यात आली आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळवली जात आहे. याआधी भारताने पर्थ येथे खेळवण्यात आलेली पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
रोहित शर्मा कितव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार?
गुलाबी चेंडू कसोटीसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. संघात पहिले दोन बदल म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे पुनरागमन झाले आहेत. रोहित दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे पर्थमधील पहिल्या कसोटीतून बाहेर पडला होता, तर गिल बोटाला झालेल्या दुखापतीमुळे पर्थमधील पहिल्या कसोटीतून बाहेर होता. तिसरा बदल भारतीय संघाच्या फिरकी विभागात झाला आहे. जिथे अश्विनने वॉशिंग्टन सुंदरची जागा घेतली आहे.
याचबरोबर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे रोहित शर्मा सलामीसाठी उतरणार नाही. त्यामुळे केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी सलामीसाठी उतरणार आहे. तर रोहित शर्मा या कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा (कर्णधार), आर. अश्विन, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, मोहम्मद सिराज
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलयाची प्लेईंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.
द