India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियवर शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सुरू झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला. अक्षर पटेल आणि अश्विन यांच्या शतकी भागीदारीने कांगारूंचा घामटा काढला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना २६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २६२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला अवघ्या एका धावेची आघाडी मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला एक धावांची आघाडी मिळाली. मॅथ्यू कुहनमनने मोहम्मद शमीला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव संपवला. शमीने नऊ चेंडूत दोन धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर भारताला ऑस्ट्रेलियाला सर्वात लहान धावसंख्येवर गुंडाळायला आवडेल. चौथ्या डावात दीडशेहून अधिक धावांचे लक्ष्य गाठणे टीम इंडियासाठी सोपे नसेल.

अक्षर पटेल आणि आर.अश्विनची शतकी भागीदारी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजा (८१) आणि पीटर हँड्सकॉम्ब (७२) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २६३ धावा केल्या. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. अक्षर पटेलने ७४ आणि विराटने ४४ धावा केल्या. अक्षर आणि अश्विनने शतकी भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने पाच, टॉड मर्फी आणि कुहनेमनने प्रत्येकी दोन बळी घेतले. पहिल्या डावाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाकडे एक धावांची आघाडी आहे. अश्विनने या खेळीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+ धावांचा पल्ला ओलांडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+धावा आणि ७००+ विकेट्स घेणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने भारताने २१ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र दोन्ही सलामीवीरांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा ३२ तर केएल राहुल १७ धावा करून बाद झाला. १००वा कसोटी समाना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला भोपळाही फोडता आला नाही. तर दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर केवळ ४ धावा करून बाद झाला. विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ४४ धावांवर असताना चुकीचा निर्णय देत पायचीत करण्यात आले. रवींद्र जडेजाही केवळ २६ धावा करू शकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 2nd test india scored 262 runs in the first innings australia has one run lead akshar and ashwin did hundred partnership avw