India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा व पीटर हॅंड्सकॉम्ब यांनी अर्धशतके झळकावली. तर, भारतासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक ४ बळी आपल्या नावे केले. त्यादरम्यान भारताचा स्टार फिरकीपटू आर. अश्विनची कृती व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू अश्विनची शमीसोबत केलेली खोडकर कृती व्हायरल होत आहे. साधारणतः घडले असे की, २४६ धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली. मोहम्मद शमीने नॅथन लायनला क्लीन बोल्ड केले. लिओनने २६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १० धावा केल्या. त्याला बाद केल्यानंतर सर्व भारतीय संघ खूप आनंदित झाले. त्यादरम्यान रविचंद्रन अश्विन मोहम्मद शमीचे अभिनंदन करण्यासाठी आला. मात्र त्याला न कळताच पाठीमागून येऊन त्याने त्याचे कान पिळले आणि एकच हशा पिकला. त्याचा व्हिडिओ चाहत्यांना फार आवडत आहे.

तत्पूर्वी, दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते. पण, उस्मान ख्वाजाने एकहाती खिंड लढवताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. त्याचे शतक हुकल्यानंतर पीटर हँड्सकोम्ब व पॅट कमिन्स यांनी ऑस्ट्रेलियाला सावरले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभी केली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर (१४) बाद झाला. वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांची ५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. ख्वाजा रिव्हर्स स्वीप मारून भारतीय फिरकीपटूंना हैराण करताना दिसला. त्याचवेळी आर अश्विनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनला (१८) पायचीत पकडल्यानंतर स्टीव स्मिथला (०) अश्विनने बाद केले. केएस भरतने अप्रतिम झेल घेतला.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: शमीची जबरदस्त गोलंदाजी! पहिल्याच दिवशी कांगारूंना बाद करण्यात टीम इंडिया यशस्वी, स्पिन ट्विन्सही चमकले

चेतेश्वर पुजाराचा १००वा कसोटी सामना

भारतीय कसोटी संघाचा नंबर-३ फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी हा कसोटी सामना खूप खास ठरला. कसोटी कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. यानंतर ही कामगिरी करणारा तो १३वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचवेळी, भारतीय संघाने दिल्ली कसोटीसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 2nd test naughty ash anna cute action with shami goes viral as nathan lion is clean bowled watch video avw