Rohit Sharma Run Out: दिल्ली कसोटी सामन्यातील तिसऱ्या भारतीय संघातील रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीचे आश्चर्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ११५ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि लोकेश राहुल केवळ १ धावा करून तंबूत परतला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करताना कांगारू संघाच्या फिरकीपटूंवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र २ धावा घेताना त्याची विकेट गमवावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपाहारानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच रोहित शर्माने २ चौकार आणि २ शानदार षटकार मारून सामना लवकर संपवण्याचा आपला इरादा स्पष्टपणे व्यक्त केला होता. यानंतर मॅथ्यू कुहनेमनचा एक चेंडू खेळताना रोहितने २ धावा काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खूप उशीर झाल्याचे पाहून त्याने आपली विकेट दिली. चेतेश्वर पुजाराने भारतासाठी विजयी धाव काढावी यासाठी कर्णधार रोहित शर्माने स्वतः त्याग करून धावबाद झाला. खरतर त्याची चूक होती कारण त्याने कॉल दिला होता. स्वतः दुसऱ्या धाव काढण्यासाठी बोलावून नंतर त्याला नाही म्हणणं हे म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे म्हणून त्याने त्याग केला.

जडेजाने ७ आणि अश्विनने ३ बळी घेतले

ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अश्विन आणि जडेजासमोर कांगारू फलंदाज झगडताना स्पष्ट दिसत होते. एकट्या जडेजाने १२.१ षटकात ४२ धावा देत ७ बळी घेतले. त्याचबरोबर अश्विनने या १६ षटकात ५९ धावा देत ३ गडी बाद केले.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! भारताचा ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून विजय; मालिकेत २-०ने विजयी आघाडी

विराट कोहलीने रचला आणखी एक विक्रम

स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला आहे. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. अशा प्रकारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विश्वविक्रम केला आहे. विराट कोहलीने दिल्लीच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ८वी धाव घेताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २५ हजार धावा करणारा ठरला. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ५७७ डावात ही कामगिरी केली होती, तर आता विराट कोहलीने ५४९व्या डावात ही कामगिरी केली.

आता पुढील तिसरा कसोटी सामना १ मार्च ते ५ मार्च दरम्यान इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. धर्मशाला येथे खरतर हा सामना होणार होता मात्र तेथील हवामान व्यवस्थित नसल्याने ते मैदान खेळण्यासाठी तयार होऊ शकले नाही म्हणून तो इंदोर येथे हलवण्यात आला. दोन्ही संघांना आता किमान आठ ते नऊ दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्यात भारतीय संघाची उर्वरित दोन कसोटीसाठी निवड होणार असून केएल राहुलला संघात स्थान मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.