Peter Handscomb Catch: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) दिल्लीत सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळले. मात्र त्यानंतर नॅथन लायनच्या शानदार गोलंदाजीने भारताला अडचणीत आणले आहे. त्याने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणले. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नॅथन लायन श्रेयस अय्यरची महत्त्वपूर्ण विकेट घेतल्याने पुन्हा एकदा त्याने त्याचा जलवा दाखवायला सुरुवात केली. लायन अव्वल फॉर्ममध्ये होता कारण त्याने आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना आज त्रास दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या डावाच्या २५व्या षटकात लायनने स्टंपवर एक चेंडू टाकला आणि अय्यरने बॅटने तो बॅकफूटवर फ्लिक केला. चेंडू शॉर्ट-लेग क्षेत्ररक्षक हँड्सकॉम्बच्या हातावर आदळला आणि नंतर त्याच्या छातीला लागून समोर उसळला आणि त्याच्या उजव्या पायावर गेला. पण हँड्सकॉम्बकडे बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी जी एकाग्रता दाखवली ती वाखाणण्याजोगी होती आणि चेंडू शरीरावर चिकटवण्यासाठी त्याने एक धमाकेदार रिफ्लेक्स झेल घेतला तो पूर्ण केला.

https://www.bcci.tv/videos/5559358/ind-vs–aus-2023-2nd-test-shreyas-iyer–wicket?tagNames=2023

भारताला ६६ धावांवर चौथा धक्का बसला. श्रेयस अय्यरने पीटर हँड्सकॉम्बच्या हाती नॅथन लायनने झेलबाद केले. श्रेयस अय्यरने १५ चेंडूत चार धावा केल्या. नॅथन लायनच्या फिरकीत अडकल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे. आता विराट कोहलीसोबत रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहे. भारताला सामन्यात टिकण्यासाठी मोठ्या भागीदारीची गरज आहे. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यास टीम इंडिया हा सामना गमावू शकते आणि त्यामुळे कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची शक्यता कमी होईल.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: ‘पहिल्यांदा नशिबाची साथ, दुसऱ्यांदा मात्र बाद!’ १००व्या कसोटी सामन्यात पुजारावर ओढवली नामुष्की

दिल्ली कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ आटोपला आहे. उपहारापर्यंत भारताची धावसंख्या ८८/४ आहे. विराट कोहली १४ आणि रवींद्र जडेजा १५ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरपेक्षा भारत अजूनही १७५ धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने चारही विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी भारताला मोठी भागीदारी आवश्यक आहे. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना दीर्घ खेळी खेळून संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जायला आवडेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 2nd test shreyas iyers one hit and peter handscombs amazing catch nathan lyons brilliant bowling see video avw