IND VS AUS 2nd Test: आज भारत विरुद्ध ऑस्टेलिया या संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत दुसरा कसोटी सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये संपन्न झाला. भारतीय संघाने ६ गडी राखून ऑस्टेलियाचा पराभव करत कसोटी मालिकेमध्ये आघाडी मिळवली. या विजयाचे श्रेय भारतीय गोलंदाजांना त्यातही आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीला जाते. पहिल्या डावामध्ये दोघांनी ३-३ गडी बाद केले होते. दुसऱ्या डावामध्ये अश्विनने ३, तर जडेजाने ७ विकेट्स कमावल्या.
सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये भारतीय फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यात सलामीवीर केएल राहुल फक्त १ धाव करुन बाद झाला. पहिल्या डावातही त्याने कमी धावा केल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून केएल राहुलची कामगिरी खालावली आहे. त्याचे कमी धावा आणि लवकर बाद होण्याचे प्रमाण वाढल्याने त्याच्यावर सर्वत्र टीका होत आहे. आजच्या सामन्यामध्ये फक्त १ धाव केल्यामुळेही त्याला ट्रोल केले जात आहे. अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलच्या आजच्या खेळीवर भाष्य केले आहे.
आणखी वाचा- विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम
व्यंकटेश प्रसाद सोशल मीडियावर फार सक्रिय आहेत. सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्याबाबत ते ट्विटरवर व्यक्त होत असतात. त्यांच्या एका ट्वीटवरुन एका चाहत्याने त्यांना ‘केएल राहुलच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटते?’ (Need a thread sir) असे विचारले. त्याचे उत्तर देताना ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामध्ये थ्रेडमध्ये हिंदीत काय म्हणतात?’ (What do they say in Hindi in MS Dhoni – The untold Story regarding Thread ?) असे उत्तर दिले. यावरुन त्यांनी ‘धागा खोल दिया’ असे अप्रत्यक्षरित्या म्हणत केएल राहुलला टोला लगावल्याचे लक्षात येते.
आणखी वाचा- पुढे सरसावत फटका मारणाऱ्या विराट कोहलीला टॉड मर्फीने ‘असा’ दिला चकवा, VIDEO होतोय व्हायरल
व्यंकटेश प्रसाद यांनी आधीही केएल राहुलच्या कामगिरीवर वक्तव्य केले होते. सध्या केएल राहुलच्या फॉर्मचा दर्जा घसरला आहे. खराब खेळीमुळे त्याला संघातून बाहेर देखील काढण्यात आले होते.