IND vs AUS Delhi test tickets: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. कांगारू संघ दशकभरानंतर या मैदानावर भारताशी दोन हात करणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सामना सुरू होण्यापूर्वीच त्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले जाणे अपेक्षित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील दुसऱ्या कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी ही वाईट बातमी समोर आली आहे

मंगळवारी पीटीआयशी बोलताना डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा म्हणाले, “दिल्ली कसोटीची सर्व तिकिटे विकली गेली आहेत आणि आम्हाला खचाखच भरलेले स्टेडियम अपेक्षित आहे.” दिल्लीत प्रदीर्घ काळानंतर कसोटी सामने होत आहेत. याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. साधारणतः अरुण जेटली स्टेडियममध्ये ४०,००० प्रेक्षक बसतील एवढी त्याची क्षमता आहे.

हेही वाचा: Jay Shah: WPL इतर खेळांसाठी परफेक्ट उदाहरण; BCCI सचिव जय शाहांचे गौरवोद्गार; म्हणाले, “रणरागिणी साठीचे क्रांतिकारी पाऊल…”

नियमानुसार, डीडीसीए सदस्यांमध्ये ८,००० तिकिटांचे वितरण करण्यात आले, तर २४,००० तिकिटांची विक्री झाली. उर्वरित जागा अधिका-यांसाठी आहेत, जे सामन्याला उपस्थित राहतील. स्टँडचा एक भाग गेममधील सुरक्षा एस्कॉर्ट्सच्या कुटुंबांसाठी राखीव आहे. कसोटी क्रिकेटची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या नागपुरातील पहिल्या कसोटीसाठी मोठ्या संख्येने चाहते आले होते. आता दुसऱ्या कसोटीतही तेच अपेक्षित आहे.

उल्लेखनीय म्हणजे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नागपूरमधील पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बॉर्डर-गावसकर मालिका महत्त्वाची आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर कांगारू टीमला ३-० ने पराभूत करावे लागेल.

हेही वाचा: Spot Fixing Allegations: मोहम्मद शमीने खरच मॅच फिक्सिंग केली होती? इशांत शर्माने असे उत्तर दिले की हसीन जहाँसह सर्वांचीच तोंडं बंद

सामन्यादरम्यान सुरक्षा पुरविणाऱ्या कुटुंबांसाठी स्टँडचा एक भाग राखीव आहे. नागपुरातील मालिकेतील पहिल्या सामन्यावेळीही मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आधी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे होणार होता, परंतु या मैदानाचे आउटफिल्ड तयार न केल्यामुळे बीसीसीआयने सोमवारी तो धर्मशाला येथून इंदोरला हलवला आहे. हा कसोटी सामना १ ते ५ मार्च या कालावधीत होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 2nd test who says test cricket is over all tickets for delhi match sold out huge excitement among fans avw