भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या वन-डे सामन्याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदाता सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर पाऊल टाकलं. भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने काळी पट्टी लावलेली आहे.

नाडकर्णी यांनी १९५५ ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध १९६८ साली खेळला होता. नाडकर्णींच्या नावावर कसोटीमध्ये एका डावात सलग २१ षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. त्यांनी १९६४ मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग २१ षटकं निर्धाव टाकली होती.

Story img Loader