भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने नवीन वर्षात आपलं पहिलं-वहिलं शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात रोहितने कांगारुंच्या गोलंदाजांचा समाचार घेत, आपल्या वन-डे कारकिर्दीतल्या २९ व्या शतकाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना रोहितने सर्वात आधी लोकेश राहुल आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली.

अवश्य वाचा – Ind vs Aus : धवन असतानाही रोहित-राहुलची जोडी उतरली सलामीला, जाणून घ्या कारण…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमधलं रोहितचं हे आठवं शतक ठरलं. या शतकी खेळीसह रोहितने विराटशी बरोबरी केली आहे. या दोन फलंदाजांव्यतिरीक्त सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं झळकावली आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने अवघ्या ४ धावा काढत वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

अवश्य वाचा – Ind vs Aus : अवघ्या ४ धावांत ‘हिटमॅन’चा विक्रम, गांगुली-सचिनला टाकलं मागे

Story img Loader