Virat Kohli celebrating in a funny way after taking the catch of Alex Carey: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना राजकोटमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मिचेल मार्श आणि डेव्हिड वार्नरने फलंदाजी करताना योग्य ठरवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३५२ धावा केल्या आणि भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात विराट कोहलीने अॅलेक्स कॅरीचा झेल घेतल्यानंतर केलेल्या मजेशीर सेलिब्रेशनचा व्हिडीओ चाहत्यांना आवडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३७ व्या षटकातील शेवटचा चेंडू जसप्रीत बुमराहने टाकला, तेव्हा ११ धावा काढून खेळत असलेल्या अॅलेक्स कॅरीने पुढच्या पायावर येऊन ऑफ साइडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने गेला. त्यावेळी विराट कोहलीने एक शानदार झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने, ज्या प्रकारे सेलिब्रेशन केले. त्याने चाहत्यांची मनं जिंकली.

विराट कोहलीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल –

ॲलेक्स कॅरीचा झेल घेतल्यानंतर आनंदच्या भरात विराट कोहली आपले खांदे उडवत आपल्या सहकाऱ्यांकडे धावू लागला. त्यानंतर रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला मिठी मारली. यापूर्वी विराट कोहली आशिया चषकादरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वॉटरबॉयच्या भूमिकेत दिसला होता. त्यातही तो खांदे उडवत धावताना दिसला होता. हा क्षण चाहत्यांना खूप आवडला होता. आताही विराट कोहलीचा मजेशीर सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – VIDEO: उष्णतेमुळे दमलेल्या स्टीव्ह स्मिथने बसण्यासाठी मैदानातच मागवली खुर्ची, विराट कोहलीने घेतली मजा

भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य –

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कांगारूंनी ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. मिचेल मार्शने ८४ चेंडूंत १३ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने ५६, स्टीव्ह स्मिथने ७४ आणि मार्नस लाबुशेनने ७२ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने 10 षटकांत ८१ धावा दिल्या. तसेच कुलदीप यादवने २, सिराज आणि कृष्णाने १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd odi video of virat kohli celebrating in a funny way after taking the catch of alex carey has gone viral vbm